Saam Exit Poll : ठाकरेंना धक्का की काँग्रेसची मुसंडी? १२ जिल्हा परिषदांच्या एक्झिट पोलची संपूर्ण आकडेवारी

Maharashtra ZP exit poll, Saam TV survey results : साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महायुतीला आघाडी मिळण्याचा अंदाज असून विरोधी पक्षांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra ZP Exit Poll 2026:
Maharashtra ZP Exit Poll 2026:Saam TV
Published On

Saam TV exit poll Maharashtra Zilla Parishad election 2026 : पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. मतदार राजाने आपला कौल मतपेट्यात बंद केला. याच १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याचा अंदाज साम टीव्हीने आपल्या सर्व्हेत व्यक्त केलाय. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरही भाजपचेच वर्चस्व असल्याचा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे आलाय. तर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसल्याचे आकड्यावरून दिसतेय.

सामच्या EXIT POLL मध्ये झेडपी निवडणुकीत भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सर्वाधिक 263 जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे...तर दुसऱ्या क्रमांकासाठी शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच होण्याचा अंदाज आहे. शिंदेसेना १५६ तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला ११८ जागा मिळण्याची शक्यता आहे. १२ जिल्हा परिषदेत काँग्रेसला ६१, ठाकरेंच्या शिवसेनेला ४८, मनसे ६ जागा मिळू शकतात, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय.

Maharashtra ZP Exit Poll 2026:
ST Bus : राज्यभरात लालपरीची चाके थांबणार, ३ दिवसात एसटी बंदचा इशारा, नेमकं प्रकरण काय आहे?

१२ जिल्हा परिषदेत कुणाला किती जागा मिळतील, याचा अंदाज साम टीव्हीच्या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. पाहा सर्व्हेचे आकडे काय सांगतात.. हा फक्त अंदाज आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल सोमवारी आयोगाकडून अधिकृत जाहीर केला जाणार आहे.

रायगड (५९ जागा)

  • भाजप - १७

  • शिंदे सेना - २५

  • राष्ट्रवादी (AP) - ११

  • ठाकरेसेना - २

  • काँग्रेस - २,

  • राष्ट्रवादी (SP) - ०

  • शेकपा - २-

  • सत्ता/निकाल (अंदाज) - शिंदेसेना.

रत्नागिरी (५६ जागा)

  • भाजप - ६

  • शिंदे सेना - ३०

  • राष्ट्रवादी (AP) - ९

  • ठाकरेसेना - १०

  • काँग्रेस - १

  • राष्ट्रवादी (SP) - ०.

  • सत्ता/निकाल (अंदाज) - शिंदेसेना.

सिंधुदुर्गं (एकूण जागा ५०) भाजप ७, शिंदेसेना १ बिनविरोध

  • भाजप - २१

  • शिंदे सेना - १३

  • राष्ट्रवादी (AP) - ०

  • ठाकरेसेना - ८

  • मनसे ६

  • काँग्रेस - ०

  • राष्ट्रवादी (SP) - ०

  • सत्ता/निकाल (अंदाज) - महायुती.

पुणे (७३)

  • भाजप - २०

  • शिंदे सेना - १०

  • राष्ट्रवादी (AP-SP) - ३०

  • ठाकरेसेना - २

  • काँग्रेस - १

  • सत्ता/निकाल (अंदाज) - राष्ट्रवादी (अजित पवार).

  • सातारा (६५)

  • भाजप - ३६

  • शिंदे सेना - ११

  • राष्ट्रवादी (AP) - १३

  • ठाकरेसेना - ०

  • काँग्रेस - ०

  • राष्ट्रवादी (SP) - ३.

  • अपक्ष -२

  • सत्ता/निकाल (अंदाज) - भाजप.

सांगली (६१)

  • भाजप - २५

  • शिंदे सेना - ४

  • राष्ट्रवादी (AP) - ५

  • ठाकरेसेना - ०

  • काँग्रेस - १४

  • राष्ट्रवादी (SP) - ११.

  • इतर - २

  • सत्ता/निकाल (अंदाज) - महायुती.

कोल्हापूर (६८)

  • भाजप - १३

  • शिंदे सेना - १४

  • राष्ट्रवादी (AP) - १०

  • ठाकरेसेना - ०

  • काँग्रेस - १४

  • राष्ट्रवादी (SP) - ३.

  • जनसुराज्य शक्ती - ६

  • इतर - ८

  • सत्ता/निकाल (अंदाज) - महायुती.

सोलापूर (६८)

  • भाजप - ३६

  • शिंदे सेना - ७

  • राष्ट्रवादी (AP) - १०

  • ठाकरेसेना - ०

  • काँग्रेस - ०

  • राष्ट्रवादी (SP) - ९.

  • सांगोला विकास आघाडी - २

  • करमाळा विकास आघाडी - ४

  • सत्ता/निकाल (अंदाज) - भाजप / महायुती.

छ.संभाजीनगर (६३)

  • भाजप - २६

  • शिंदे सेना - २०

  • राष्ट्रवादी (AP) - ८

  • ठाकरेसेना - ६

  • काँग्रेस - १

  • राष्ट्रवादी (SP) - ०.

  • एमआयएम - १

  • सत्ता/निकाल (अंदाज) - महायुती

धाराशिव (५५)

  • भाजप - २२

  • शिंदे सेना - ११

  • राष्ट्रवादी (AP) - ०

  • ठाकरेसेना - १४

  • काँग्रेस - ३

  • राष्ट्रवादी (SP) - ४

  • अपक्ष - १

  • सत्ता/निकाल (अंदाज) - महायुती

लातूर (५९)

  • भाजप - २०

  • शिंदे सेना - ३

  • राष्ट्रवादी (AP) - ८

  • ठाकरेसेना - १

  • काँग्रेस - २१

  • राष्ट्रवादी (SP) - २

  • वंचित १

  • अपक्ष ३

  • सत्ता/निकाल (अंदाज) - काँग्रेस / भाजप (काटाजोड लढत).

परभणी (५४)

  • भाजप - २१

  • शिंदे सेना - ८

  • राष्ट्रवादी (AP) - १४

  • ठाकरेसेना - ५

  • काँग्रेस - ४

  • राष्ट्रवादी (SP) - ०

  • रासप १

  • वंचित १

  • सत्ता/निकाल (अंदाज) - ठाकरेसेना

Maharashtra ZP Exit Poll 2026:
Gold Rate Today : 'रोझ डे'ला सोन्याचे दर वाढले, प्रति तोळा झालं इतके; वाचा 24, 22 ,18 कॅरेटचे लेटेस्ट गोल्ड रेट

कोकणात रायगड आणि रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुसंडी मारणार असल्याचे दिसतेय. तर सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसतेय. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमध्ये महायुती बहुमताकडे झुकत आहे, तर लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.

टीप - वरील आकडे फक्त सर्व्हेचा अंदाज आहे. अधिकृत निकाल सोमवारी आयोगाकडून जाहीर केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com