ST Bus : राज्यभरात लालपरीची चाके थांबणार, ३ दिवसात एसटी बंदचा इशारा, नेमकं प्रकरण काय आहे?

Maharashtra ST bus strike latest news update : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला ३ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर एसटी सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. संभाव्य संपामुळे प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra ST Bus Employees Strike : मागण्या मान्य न झाल्यास एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून त्यासाठी सरकारला ३ दिवसांचा वेळ दिलाय. राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्यास महाराष्ट्र बंदसारखी स्थिती होऊ शकते. राज्य सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेय. (MSRTC employees salary and allowance dispute details)

राज्यभर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय..वेतन मिळाले तरी वेतनातील फरक आणि मासिक भत्ता न मिळाल्याने एसटी कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेने सरकारला तीन दिवसांचा अवधी दिलाय.. तीन दिवसात वाढीव रक्कम मिळावी...याबाबत सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर एसटी सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय..त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com