Mumbai : लग्नाच्या २० वर्षांनंतर लक्ष्यचा जन्म, पण पालकांसमोरच नियतीने घात केला, कारखाली चिरडल्याने एकुलत्या एक मुलाचा मृत्यू

Mumbai Hit-and-Run Case : मुंबईच्या मालाड पूर्व परिसरात झालेल्या धक्कादायक हिट अँड रन घटनेत चार वर्षाच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. भरधाव इनोव्हा क्रिस्टा कारने धडक दिल्यानंतर चालक फरार झाला असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Mumbai Hit-and-Run Case
Mumbai Hit-and-Run CaseSaam TV Marathi
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Malad East hit and run case 4 year old boy death : मुंबईतील मालाड पूर्वेकडील निलयोग विराट इमारत परिसरात हृदयद्रावक हिट अँड रनची घटना घडली आहे. इमारतीत राहणाऱ्या सिंग कुटुंबावर आनंदाच्या क्षणांनंतर अवघ्या दोन दिवसांत दु:खाचा डोंगर कोसळला. ५ तारखेला कुटुंबात लग्नसोहळा पार पडला होता, ६ तारखेला संपूर्ण कुटुंब एकत्र होते, तर ७ तारखेला सकाळी त्यांचा चार वर्षांचा मुलगा लक्ष्य इमारतीखाली खेळत असताना भरधाव कारने चिरडले. या अपघाताची माहिती सुरक्षा रक्षकाला देऊन कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा तपास केला जात आहे. धक्कादायक म्हणजे, कार अपघातात मृत्युमुखी पडलेला लक्ष हा पालकांच्या लग्नानंतर २० वर्षांनी झाला होता. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने सिंह कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळलाय. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात चार वर्षांच्या मुलाला चिरडल्यानंतर गाडी अचानक थांबताना दिसते. त्यानंतर चालक वॉचमनला सूचना देतो. थोड्याच वेळात, वॉचमन मुलाला हातात घेऊन जाताना दिसतो. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

Mumbai Hit-and-Run Case
Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाची सुरुवात! सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा चार्ज; पाहा व्हिडिओ

भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारने निष्पाप चार वर्षांच्या लक्ष्यला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला देऊन कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या लक्ष्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत लक्ष्यचे वडील जयप्रकाश सिंग यांनी सांगितले की, “अपघातानंतर जर कारचालकाने माझ्या मुलाला तात्काळ रुग्णालयात नेले असते, तर कदाचित आज तो जिवंत असता.” त्यांनी पुढे सांगितले की आरोपीचे त्या इमारतीत पार्किंग असले तरी तो प्रत्यक्षात दुसऱ्याच ठिकाणी राहत होता.

Mumbai Hit-and-Run Case
मोठी बातमी! CM फडणवीस अचानक अमित शाहांच्या भेटीला, राष्ट्रवादीच्या विलिनिकरणार निर्णय?

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि आरोपीला जामीन देण्याची तयारी सुरू होती. मात्र ही माहिती मिळताच सिंग कुटुंबासह नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीला जामीन देण्यापासून रोखले. जयप्रकाश सिंग यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, कारचालकाने केवळ धडक दिली नाही, तर त्यांच्या चार वर्षांच्या निष्पाप मुलाला काही अंतर गाडीसोबत ओढत नेले. ही थेट हिट अँड रनची घटना असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, निष्पाप बालकाच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे.

Mumbai Hit-and-Run Case
ZP election Result : भाजप खासदाराला पराभवाचा धक्का, जिल्हा परिषदेत पत्नीचा दारूण पराभव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com