Pune minor girl pregnancy and delivery case full details : पुणे शहरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने कोणाच्याही मदतीशिवाय घरातच बाळाला जन्म दिला. अत्यंत धक्कादायक आणि विदारक म्हणजे प्रसूतीनंतर त्या मुलीने स्वतःच बाळाची नाळ कापली. घरात जिकडे तिकडे रक्त माखलेले होते. मुलीने नाळ कापल्यानंतर त्या नवजात जिवाला खिडकीत ठेवले होते. १५ वर्षाच्या मुलीची बहीण घरी अचानक घरी आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकरली. सर्व दृश्य पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. याप्रकरणी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिासंकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. ही घटना मार्च २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, नाना पेठ परिसरातील 'गोल्डन सिटी बिल्डिंग'मध्ये ही हादरवणारी घटना घडली. पीडित मुलीची मोठी बहीण ३१ जानेवारी रोजी सकाळी आपल्या माहेरी आली होती. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर पीडितेचा भाऊ घरी आल्यानंतर त्याने हाक मारली. त्यावेळी धाकट्या बहिणीने दरवाजा उघडला. पण घरात जाताच समोरचे दृश्य पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. घराच्या फरशीवर सर्वत्र रक्ताचे डाग होते आणि १५ वर्षांची बहीण रक्ताने माखलेल्या अवस्थेत उभी होती. खिडकीत नवजात बाळ होते.
पीडित मुलीची बहीण आणि भावाने घरात प्रवेश केला. त्यावेळी ते सुन्न झाले. त्या दोघांना खिडकीजवळ एक नवजात बाळ दिसून आले. दोघांनी बहिणीला विश्वासात घेऊन सर्व काही विचारले. त्यावेळी त्या १५ वर्षाच्या मुलीने शब्द ना शब्द सांगितला. १५ वर्षाच्या मुलीने घरातच प्रसूती केली. त्यानंतर तिला काय करावे हे समजले नाही. त्यामुळे तिने स्वत:च बाळाची नाळ कापली. घाबरलेल्या मुलीने बाळाला खिडकीत ठेवले होते. आदिल शेख याचे नाव समोर आले.
याप्रकरणी पीडितेच्या बहिणीने तात्काळ पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. आदिल फारुख शेख (रा. न्यू नाना पेठ) याच्या विरोधात समर्थ पोलिसांनी पोक्सो (POCSO) आणि अत्याचाराच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मार्च २०२५ पासून आरोपीचे पीडितेशी संबंध होते. त्याने अनेकदा तिच्यावर बळजबरी केली. त्यामधूनच ती गर्भवती राहिली होती.
या धक्कागायक घटनेनंतर पुणे शहरात खळबळ उडवून दिली अन् अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. मुलगी ९ महिने गर्भवती असतानाही तिच्या घरच्यांना याबद्दल काहीच कसे समजले नाही? इतक्या लहान वयात तिने घरातच प्रसूती होण्यापर्यंतचे धाडस कसे केले? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी आरोपी आदिल शेख याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.