Ajit Pawar death : अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांच्या मनातही शंका, आज मोठे खुलासे करणार

Ajit Pawar death news update : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. आज मुंबईत होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील नवीन घडामोडी जाणून घ्या.

Baramati plane crash case details : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रातील अनेकांच्या मनात शंका आहेत. अमोल मिटकरी यांनी आपल्या मनातील शंका बोलून दाखवल्या. आता पवार कुटुंबातील सदस्य रोहित पवार यांनाही आपल्या मनात याबाबत शंका असल्याने म्हटलेय. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. ४ वाजता मुंबईमध्ये रोहित पवार पत्रकार परिषदेत काय खुलासे करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Rohit Pawar press conference Ajit Pawar accident full details)

बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स खात्यावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com