Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या

Husband Killed Wife In Badlapur: बदलापूरमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केली. अनैतिक संबंधातून ही हत्याकांडाची घटना घडली. पोलिसांनी आरोपी नवरा आणि सासूला अटक केली.
Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या
Badlapur CrimeSaam Tv
Published On
  • अनैतिक संबंधाच्या वादात टोकाचं भांडण

  • बदलापूरमध्ये नवऱ्याकडून बायकोची हत्या

  • आरोपी नवऱ्याने मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा बनाव रचला

  • पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हत्या झाल्याचे उघड

मयूरेश कडव, बदलापूर

बदलापूरमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. अनैतिक संबंधातून ही घटना घडली. बायकोचे नाक-तोंड दाबून त्याने तिला संपवलं. या हत्याकांडामुळे बदलापूर हादरले. आरोपीने सुरूवातीला बायकोचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला होता. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हत्या झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नवरा आणि सासूला अटक केली. पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात बायकोची नाक-तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव नवऱ्याने रचला होता. पण शेवटी पोस्टमॉर्टम रिपोर्टने त्याचे बिंग फुटलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी नवरा आणि त्याच्या आईला बेड्या ठोकल्या. नवऱ्याचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि तो बायकोवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. पण त्याच्या बायकोने घटस्फोटाला नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने तिची नाक-तोंड दाबून हत्या केली असल्याचे पोलीस तपासातून उघड झाले.

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या
Crime: दुचाकीला कट मारल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाला दगड अन् लोखंडी रॉडने हात-पाय तुटेपर्यंत मारहाण

प्राजक्ता मेहेर असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. प्राजक्ताचे २०१० मध्ये बदलापूरच्या एरंजाड गावात राहणाऱ्या योगेश मेहेर याच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना १५ वर्षे आणि ११ वर्षांची दोन मुलंही आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून योगेशचे गावातच राहणाऱ्या पूजा मेहेर नावाच्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. यातूनच योगेशने बायको प्राजक्ताला घटस्फोटासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. १४ मार्च २०२६6 रोजी प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून हवे तितके पैसे घ्या, आणि मुलीला घेऊन जा, अशी ऑफर योगेशने दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केला.

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या
Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

यानंतर ८ एप्रिल रोजी योगेश आणि प्राजक्तामध्ये पुन्हा भांडण झालं. ९ एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदही केली. मात्र प्राजक्ताच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्यानं मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि व्हिसेरा सांभाळून ठेवण्यात आला. याचाच रिपोर्ट २३ जून रोजी आला. ज्यात प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाक- तोंड दाबून तिची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं.

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या
Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी योगेश मेहेर आणि त्याची आई अरुणा मेहेर यांना अटक केली. तर या प्रकरणात योगेशची प्रेयसी पूजा मेहेर, तसंच नणंद हर्षदा कोंडीलकर, कुसुम बोराडे यांनाही आरोपी करण्याची प्राजक्ताच्या कुटुंबियांची मागणी केली आहे. त्यानुसार तपास सुरू असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.

Badlapur Crime: बदलापूर हादरले! अनैतिक संबंधावरून कडाक्याचं भांडण, नवऱ्याकडून बायकोची नाक-तोंड दाबून हत्या
Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com