Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

Ketan Agarwal Killed Case: पुण्याचे प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. त्याच्या हत्येचे प्लान पुण्यातील कॅफेमध्ये करण्यात आले होते.
Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी
Saam Tv
Published On
  • लोहगडावर झालेला केतन अग्रवालचा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

  • हत्येसाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी तीन वेगवेगळे प्लॅन तयार केले होते

  • दोघांमध्ये 2004 फोन कॉल्स आणि 238 तास चर्चा झाली होती

  • पोलिसांनी सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे कटाचा पर्दाफाश केला

सुप्रीम मसकर, साम टीव्ही

पुण्याच्या लोहगडावर झालेल्या केतन अग्रवालच्या हत्येबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं केतनच्या हत्येचा कट नेमका कसा रचला? पुण्याच्या कॅफेत हत्येसाठी तीन कट कसे ठरले? त्यासाठी सिया आणि केतनमध्ये किती कॉल झाले. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

जे डोळ्यांना दिसतं, ते नेहमीच खरं असतं असं नाही. कधीकधी एका साध्या अपघाताच्या मागे दडलेला असतो एक अत्यंत क्रूर आणि थंड डोक्याने आखलेला 'कोल्ड ब्लडेड मर्डर'. पुण्याच्या लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून खोल दरीत पडलेल्या केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला. आणि संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं या अपघातामागील मोठ्याचा कटाचा पर्दाफाश केला. ज्यानं सर्वांनाच हादरवून सोडलं. केतनच्या हत्येआधी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघे पुण्यातल्या एका कॅफेमध्ये भेटले आणि याच भेटीत त्यांनी केतनला मारण्याचा प्लॅन बनवला.

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी
Pune Crime: बिल्डर अग्रवालच्या मुलाला होणाऱ्या बायकोनं किल्ल्यावरून ढकललं, पण बॉयफ्रेंडमुळं प्लान फसला, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

प्लॅन A -

4 जून रोजी केतननं सियासोबत इंडोनेशियातील 'बाली'त प्री-वेडिंग फोटोशूटचा प्लॅन केला. विमानाची तिकिटं बुक झाली. मात्र पुण्यातून मुंबई विमानतळाकडे जात असताना, सियानं केतनचा पासपोर्ट चोरला, त्याचे तुकडे करून फूड मॉलच्या वॉशरुममध्ये फ्लॅश करत पासपोर्ट हरवल्याचा नाटक केलं... ज्यामुळे इंडोनेशियातील प्री-वेडिंग रद्द करण्यात आलं.त्यानंतर 14 जूनला सियानं लोहगड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट धरला. तिथेच फोटो काढण्याच्या बहाण्यानं सियानं केतनला धक्का दिला... मात्र त्यावेळी केतन एका झुडपाच्या आधारामुळे वाचला. स्वतःचा डाव फसल्याचे लक्षात येताच सियाने 'साप, साप' ओरडत केतनला मिठी मारली. केतनला वाटलं की सियाने त्याला सापापासून वाचवण्यासाठी धक्का दिला होता.

प्लॅन B -

प्लॅन A फसल्यानंतर सियानं 18 जूनचा प्लॅन रचला. 20 जूनला सियाचा वाढदिवस होता. सासऱ्यांनी महाबळेश्वरमध्ये 70 रूम्स बुक केल्या होत्या. मात्र तिथे सर्व कुटुंबीयांशी भेट होईल या भीतीनं सियानं प्री- बर्थडेसाठी 18 जूनला केतनला पुन्हा लोहगडावर नेले... आणि प्रियकर चेतनसोबत मिळून सियानं केतनला खोल दरीत धक्का दिला...

प्लॅन C -

विशेष म्हणजे, प्लॅन B फेल झाला असता तर चेतनच्या मदतीनं महाबळेश्वरमध्ये केतनचा जीव घेण्याचा सियाचा तिसरा प्लॅन रेडी होता...

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी
Pune Crime: बिल्डर अग्रवाल यांच्या मुलाच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा; सिया आणि चेतननं 14 जूनलाच आखला होता कट

या प्रकरणात सुरुवातीला केतनचा अपघात झाल्याचा बनाव सियानं केला. मात्र पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासताच सियाचा प्रियकर चेतन चौधरीही लोहगडावर असल्याचं आढळलं. एका सीसीटिव्हीमध्ये तर चेतन आणि सिया 'साइन लँग्वेज'मध्ये एकमेकांना संकेत देत असल्याचं उघड झालयं.त्यातही हत्येच्या दिवशी 18 जूनला चेतननं पोलिसांना चकवा देण्यासाठी स्वत:चा मोबाईल फोन कोंढव्यातील घरीच इंटरनेट बंद करून ठेवला आणि घरातील कामगाराचा मोबाईल घेऊन तो लोहगडावर गेल्याचं ही समोर आलंय. आता केतन अग्रवालच्या वडीलांनीही 14 जून रोजी अपघातात केतन बचावल्याचं कबुल केलयं आणि हत्येचा प्रकार लक्षात आला नसल्याचं सांगितलयं.

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी
Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

दरम्यान पोलिसांनी जेव्हा सिया आणि चेतनचा सीडीआर तपासला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं. गेल्या 6 महिन्यांत या दोघांमध्ये तब्बल 2 हजार 4 वेळा फोन कॉल्स झाले होते. म्हणजे जवळपास 238 तास दोघेंमध्येही फोनवरून बोलणं झाल्याचं समोर आलयं. त्यामुळे ही चर्चा प्रेमापुरती मर्यादीत नव्हती, तर एका निष्पाप तरुणाचा काटा कसा काढायचा याची होती. ज्या घरात लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते, तिथे आज केतनच्या मृत्यूचा शोक पसरलाय...प्रेमाच्या धुंदीत आंधळे झालेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरीला त्यांच्या क्रूर कृत्यांमुळे कडक शिक्षा मिळणारच, पण या घटनेनं पुन्हा एकदा नात्यांमधील विश्वासार्हतेवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलयं.

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी
Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com