Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

daylight firing incident in patas pune district : पुण्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे भरदुपारी गोळीबाराची घटना घडली. दोन गटांतील वादानंतर हाणामारी झाली आणि नंतर गोळीबार झाला.
पुण्यातील पाटसमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार
daund Patas Firingsaam tv
Published On

मंगेश कचरे/ सागर आव्हाड | साम टीव्ही

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून, आज शुक्रवारी भरदुपारी दौंड तालुक्यातील पाटसमध्ये गोळीबाराची घटना घडली. दोन गटांमध्ये झालेला वाद चिघळला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. त्याचवेळी काही तरुणांनी गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. या घटनेमुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयित तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

पाटसमध्ये शुक्रवारी दुपारी दोन गटांत वाद झाला. वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. त्यानंतर काही तरुणांनी पिस्तुलातून गोळीबार केला. काष्टीतील काही तरुणांचा गट आणि पाटसमधील तरुणांच्या गटात सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारी झाली. संतापलेल्या काही तरुणांनी जवळील गावठी पिस्तुल बाहेर काढला आणि तीन राउंड फायर केले, अशी प्राथमिक माहिती समोर आली. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या परिसरात काष्टीतील काही तरूण आले होते. त्यांची आणि पाटस येथील तरुणांची काही कारणांवरून बाचाबाची झाली. त्यांच्यातला वाद वाढला. त्यानंतर दोन्ही गटांत हाणामारी झाली. काही तरुणांकडून दगडफेक करण्यात आली. राग अनावर झाल्यानंतर काही तरुणांनी गावठी पिस्तूल काढून हवेत आणि विरुद्ध गटातील तरुणांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समजते.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. काही संशयित तरुणांना ताब्यात घेतलं. घटनास्थळावरून रिकामी काडतुसे जप्त केली आहेत, अशी माहिती मिळाली. गोळीबाराच्या घटनेआधीही दोन गटांत वाद झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला होता. मात्र, पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा वाद झाला आणि त्यानंतर गोळीबाराची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यातील पाटसमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार
Crime News : शिंदेसेनेच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा; गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पाठलाग करून तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. काही संशयित आरोपी जवळच्या ऊसाच्या शेतात घुसले. काही वेळाने पोलिसांनी ऊसाच्या शेताला वेढा घालून संशयितांचा शोध सुरू केला.

पुण्यातील पाटसमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार
Pune Crime: पुण्यात रक्तरंजित थरार! विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची हत्या, झोपेत असताना चाकूने सपासप वार करत संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com