Crime News : शिंदेसेनेच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा; गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल

Sahil Chougule Navi Mumbai crime news : नवी मुंबईतील शिवसेना (शिंदे गट) स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांच्याविरोधात बलात्कार आणि पाठलागाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने गंभीर आरोप केले असून चौगुले यांनी हे आरोप राजकीय कटाचा भाग असल्याचा दावा केला आहे.
Sahil Chougule Navi Mumbai crime news
Shiv Sena functionary Sahil Chougule faces a physical abused and stalking case registered by Rabale Police in Navi Mumbai.Sahil Chougule/FB
Published On

Sahil Chougule rape case, Navi Mumbai crime news : नवी मुंबईतील शिवसेना (शिंदे गट) स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साहिल चौगुले यांनी आपल्यावर अनेक वेळा अत्याचार केले आणि आपले अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

साहिल चौगुले हे नवी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नगरसेवक विजय चौगुले यांचे भाचे आहेत.

(Shiv Sena Leader Sahil Chougule Booked in Rape Case in Navi Mumbai, Calls Allegations a Political Conspiracy)

दरम्यान, ज्या महिलेने हा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, त्याच महिलेने 'हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला' असल्याचा अर्ज मे महिन्यात पोलिसांना दिला होता. मात्र, त्यानंतर काल मध्यरात्री तिने पुन्हा पोलीस ठाण्यात जाऊन साहिल चौगुले यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली. विशेष म्हणजे याच महिलेने यापूर्वी इतर तीन पुरुषांविरोधातही बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या होत्या आणि नंतर त्या मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Sahil Chougule Navi Mumbai crime news
भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?
विरोधी राजकीय पक्षातील एका व्यक्तीने मला बदनाम करण्यासाठी रचलेला हा राजकीय कट असल्याचे दिसते. त्यासाठी तक्रारदार महिलेला प्यादे म्हणून वापरून माझे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने माझ्याविरुद्ध खोटी एफआयआर दाखल करण्यात आली.
साहिल चौगुले

रबाळे पोलिसांनी बुधवारी २५ वर्षीय साहिल चौगुले यांच्या विरोधात बलात्कार आणि पाठलाग केल्याचा गुन्हा दाखल केला. चौगुले यांनी सर्व आरोप खोटे असून हा राजकीय कट असल्याची म्हटले आहे. चौगुलेंवर जुलै २०२४ पासून एका २६ वर्षीय महिलेवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याचा साथीदार, ऐरोलीच्या चिंचपाडा येथील रहिवासी अमित मौर्य याला सहआरोपी बनवण्यात आले आहे. कारण त्याने स्वतःच्या नावावर हॉटेलची खोली बुक केली होती, जिथे चौगुलेने कथितरित्या त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे.

Sahil Chougule Navi Mumbai crime news
Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

प्रकरणाचा तपास सुरू असल्याने चौगुले आणि मौर्य यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले. आरोपावर चौगुले म्हणाले की, त्या महिलेने बलात्काराचे खोटे आरोप केले होते. हे तिने पैसे उकळण्यासाठी अनेकदा करते. गेल्या वर्षी त्या महिलेने राबाळे एमआयडीसीच्या एका पोलीस निरीक्षकाला लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली होती. मी राबाळे पोलिसांना एक ऑडिओ क्लिप सादर केली आहे, ज्यामध्ये तक्रारदार महिला असा दावा करत आहे की, ती तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची खोटी तक्रार दाखल करून आपल्या लोकांना जाळ्यात ओढते आणि पैसे उकळण्यासाठी ब्लॅकमेल करते.

Sahil Chougule Navi Mumbai crime news
Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

महिलेने तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. जुलै २०२४ मध्ये महिला तिथे काम करणाऱ्या तिच्या काकांना भेटण्यासाठी चौगुले यांच्या ऐरोली येथील अपार्टमेंटमध्ये गेली होती. तेव्हा त्यांनी तिला तिचे काका परत येईपर्यंत अपार्टमेंटमध्ये थांबायला सांगितले. त्यांनी गुंगीचे औषध मिसळलेले शीतपेय दिले आणि ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा तिच्या लक्षात आले की त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. चौगुले यांनी तिचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यांनी तिच्या पतीला आणि अल्पवयीन मुलाला इजा करण्याची धमकीही दिली, असे तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

Sahil Chougule Navi Mumbai crime news
RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com