RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

RBI MPC Meeting : आरबीआयच्या एमपीसी बैठकीत रेपो रेट 5.25% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयवर तातडीने कोणताही परिणाम होणार नाही. जाणून घ्या आरबीआयच्या निर्णयाचे सर्वसामान्यांवर होणारे परिणाम.
RBI
RBI google
Published On

RBI MPC meeting repo rate decision 2026 : देशातील कोट्यवधी बँक ग्राहक आणि कर्जदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) व्याजदर म्हणजेच रेपो दर आज जाहीर केले आहेत. संजय मल्होत्रा यांनी आज केंद्रीय बँकेच्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीतील निर्णयांची घोषणा केली. महागाईवर नियंत्रण ठेवणे आणि आर्थिक विकासाला गती देणे या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत आरबीआयने यावेळचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात बँकेने कोणताही बदल केला नाही. रेपो रेट ५.२५% इतकाच कायम ठेवला आहे.

आखाती देशात सुरू असलेल्या तणामुळे इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्याशिवाय सोन्याच्याही किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील महागाई वाढवत असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच रेपो रेट वाढू शकतो, असा अंदाज अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. पण रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा अर्थ रेपो दर ५.२५% इतकाच ठेवण्यात आला आहे. रेपो दरात बदल न झाल्याने तुमच्या ईएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही. गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदर जैसे थेच राहतील.

प्रमुख धोरणात्मक दर (जे अजूनही लागू आहेत)

रेपो दर: ५.२५%

स्थायी ठेव सुविधा (एसडीएफ): ५%

सीमांत स्थायी सुविधा (एमएसएफ) आणि बँक दर: ५.५०%

धोरणात्मक भूमिका: तटस्थ

रेपो रेटमध्ये बदल की जैसे थे परिस्थिती?

आरबीआय गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार, या वेळीही रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पश्चिम आशियाई संकटामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि रुपयाच्या घसरणीमुळे मध्यवर्ती बँकेच्या या बैठकीकडे प्रमुख अर्थतज्ज्ञांचे बारकाईने लक्ष होते. यापूर्वी, प्रमुख अर्थतज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला होता की, रिझर्व्ह बँक या बैठकीत व्याजदरात कोणताही बदल करणार नाही. पण काही विश्लेषकांनी व्याजदरात वाढ करण्याची मागणी केली होती.

RBI
भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?

रेपो रेट स्थिर राहिल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कोणताही अतिरिक्त फटका बसणार नाही. जर तुम्ही नवीन होम लोन (Home Loan), कार लोन (Car Loan) किंवा पर्सनल लोन (Personal Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर व्याजदर वाढण्याची शक्यता सध्यातरी टळली आहे. ज्यांचे कर्ज आधीच सुरू आहे आणि ज्यांचे व्याजदर फ्लोटिंग (Floating Rate) आहेत, त्यांच्या मासिक हप्त्यामध्ये (EMI) कोणताही बदल होणार नाही. तुमची EMI आहे तेवढीच राहील.

RBI
मोठी बातमी! शनिवारी दुपारी २ नंतर १४ तासांचा जम्बोब्लॉक, या एक्सप्रेस-लोकल रद्द, अनेकांचे मार्ग बदलले, पाहा सविस्तर माहिती

रेपो रेट म्हणजे काय?

रिझर्व्ह बँक ज्या दराने इतर वाणिज्य बँकांना (उदा. SBI, HDFC, ICICI) कर्ज देते, त्याला 'रेपो रेट' म्हणतात. रेपो रेट स्थिर राहिल्याचा थेट अर्थ असा की, बँकांसाठी आरबीआयकडून मिळणारे कर्ज महागलेले नाही. बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महागल्याचा परिणाम रेपो रेटवर होतो. कारण, बँका आपल्यावरील भार आपल्या ग्राहकांवर टाकतात आणि गृहकर्ज, वाहन कर्ज व वैयक्तिक कर्ज यांसारख्या सर्व कर्जांवरील व्याजदर वाढवतात.

RBI
Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com