Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana, ₹1500 installment : लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा ₹१५०० हप्ता अद्याप जमा झाला नाही. पात्र महिलांच्या खात्यात पैसे नेमके कधी जमा होणार?
Ladki Bahin May installment update
Ladki Bahin Yojana May installment date updateSaam Tv
Published On

Ladki Bahin Yojana May installment date update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलां मे महिन्याच्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला, पण अद्याप १५०० रूपयांच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या १५ तारखेनंतर जमा झाला होता. आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? असा प्रश्न लाडकीच्या मनात आहे. मे महिन्याचा हप्ता (१५०० रुपये) अद्याप जमा झालेला नाही. यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (When will Ladki Bahin May installment be credited)

किती महिला अपात्र?

ईकेवायसी पडताळणीनंतर लाडकी बहीण योजनेतील अनेक महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार ८० लाख महिलांचा लाभ बंद झाला आहे. तर एक कोटी ६६ लाख महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.

Ladki Bahin May installment update
Fact Check : महात्मा गांधींचा फोटो नसलेल्या प्लास्टिकच्या नोटा RBI आणणार? 'त्या' दाव्याचे सत्य आले समोर

मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार?

अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की मे महिन्याचा हा हप्ता कधी मिळणार? तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सरकारकडून हप्त्याची रक्कम वर्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या १२ ते १५ जून दरम्यान सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात मे महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते.

Ladki Bahin May installment update
Maharashtra politics : पुणे, कोकणसह विधान परिषद निवडणूक बिनविरोध, सत्ताधाऱ्यांचा मविआला जोरदार झटका; पाहा कुठे काय झालं?

पात्र असताना मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही?

शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण रखडण्यामागे बँक खात्यांचे 'डीबीटी' (Direct Benefit Transfer) अपेडशन हे कारण असू शकते. तसेच अनेक महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे किंवा बँक खात्यात त्रुटी असणे यामुळेही पैसे जमा होण्यास अडचण येत आहे.

महिलांनी 'या' गोष्टी त्वरित कराव्यात

तुमचे बँक खाते आधार कार्डशी (Aadhaar Link) जोडलेले आहे की नाही हे तपासा.

बँक खात्याचे डीबीटी (DBT) स्टेटस ॲक्टिव्ह असल्याची खात्री करा.

योजनेच्या अधिकृत पोर्टल किंवा ॲपवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती (Application Status) 'मंजूर' (Approved) आहे ना, हे एकदा नक्की चेक करा.

Ladki Bahin May installment update
Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com