Maharashtra politics : पुणे, कोकणसह विधान परिषद निवडणूक बिनविरोध, सत्ताधाऱ्यांचा मविआला जोरदार झटका; पाहा कुठे काय झालं?

Mahayuti vs MVA : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मतदानाआधीच मोठी आघाडी घेतली आहे. पुणे, यवतमाळ, वर्धा आणि कोकणमध्ये विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक जागा बिनविरोध झाल्या असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
 महायुती
Maharashtra politics Saam Tv
Published On

जिल्हा परिषद निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड विधान परिषद निवडणुकीतही आल्याचे चित्र आहे. राज्यात १७ ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थ्येंच्या विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत. महायुती विरूद्ध मविआ असा थेट सामना राज्यात पुन्हा एकदा रंगलाय. पण यात महायुतीने मतदान होण्याआधीच ४ ठिकाणी बाजी मारली आहे. त्याशिवाय महायुतीला अनेक ठिकाणी बंडखोरी थांबवण्यातही यश आले आहे. दुसरीकडे मविआला मात्र जोरदार धक्का बसला आहे. आज अर्ज माघारी घेण्याच्या काही तास आधी ४ ठिकाणी विरोधकांच्या तलवारी म्यान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यात राष्ट्रवादीचा विजय -

पुणे विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्षाने आदेश दिल्याने माघार घेत असल्याच श्रिकांत पाटील यांनी सांगितले. काल दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटल्यानंतर झालेली महत्त्वाची घडामोड घडली आहे.

 महायुती
MLC Election : बंडखोरी थांबली! अब्दुल सत्तारांचा मुलगा उमेदवारी अर्ज घेणार मागे

काँग्रेस उमेदवारची माघार, भाजपचा विजय -

वर्धा विधान परिषद मतदार संघातील काँग्रेसचे मविआचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे वर्धा गडचिरोली चंद्रपूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली. काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती आज प्रसार माध्यमांना दिली. त्यानंतर भाजपाचे अरुण लखानी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

 महायुती
आनंदवार्ता! अखेर मान्सून केरळमध्ये धडकला, महाराष्ट्रात कधी पोहचणार? तारखा आतच नोट करा

यवतमाळमध्ये शिदेंच्या शिवसेनेचा बिनविरोध झेंडा-

यवतमाळ विधान परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. यवतमाळची विधान परिषदेची जागा बिनविरोध झाली आहे. कारण, येथील सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहेत. शेवटच्या क्षणी भाजप बंडखोर नितीन भुतडा यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदेसेनेचे दृष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले. यवतमाळच्या विधान परिषदेच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध निवडणूक झाली आहे.

 महायुती
राणेंनी कोकणात डाव टाकला! उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का; शेवटच्या तासात बाळ मानेंची माघार

राणेंचा डाव, ठाकरे चितपट अन् राष्ट्रवादीचा विजय

मंत्री नितेश राणे यांच्या शिष्टाईमुळे कोकणातील जागाही बिनविरोध झाली. राणे यांनी बाळ माने यांची भेट घेऊन जिल्हाधिकार्यालयात नेलं.. बाळ माने यांनी थोड्यावेळापूर्वीच उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्व आमदारांचे आभार मानले. अजित पवारांच्या पुण्याईमुळेच हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

कोकणातील विधानपरिषदेची निवडणूक ही बिनविरोध झाली असून महाविकास आघाडीचे बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची जवळजवळ बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. अनिकेत तटकरे यांना त्यांनी शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे आमचा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलय. अनिकेत तटकरे यांना महायुती म्हणून ही जागा मिळाली असून राज्यात देखील महायुती म्हणून एकमेकांच्या विरोधात कोणी उभ राहू नये असा असला देखील त्यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com