RBI New Currency Notes Update : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआय लवकरच प्लास्टिकच्या नोटा आणणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पण महात्मा गांधी यांचा फोटो हटवून नवीन प्लास्टिकच्या (पॉलिमर) नोटा जारी करणार असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये किती सत्य आहे? आरसीबीआय खरेच प्लास्टिकच्या नोटा आणणार का? नोटांवर महात्मा गांधींचा फोटो हटवला जाईल का? याचं उत्तर आरबीआयकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या डीजीपीआर या एक्स खात्यावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
आरबीआय महात्मा गांधी यांचा फोटो हटवून नवीन प्लास्टिकच्या (पॉलिमर) नोटा जारी करणार आहे. या मेसेजसोबत १० आणि २० रुपयांच्या नव्या प्लास्टिक नोटांचे फोटोही जोडण्यात आले आहेत. पण यात कोणतेही तथ्य अथवा सत्य नाही. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR Fact Check) या दाव्याचे संपूर्ण खंडन केले असून हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.
व्हायरल दाव्याचे सत्य काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अधिकृत माहिती डीजीआयपीएरने दिली आहे. रिझर्व्ह बँकेकडून केवळ १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर (प्लास्टिक) नोटांच्या संभाव्य पायलट प्रोजेक्टबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. आरबीआयने महात्मा गांधींचा फोटो हटवण्याबाबत किंवा नवीन प्लास्टिक नोटा बाजारात आणण्याबाबत असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. सोशल मीडियावर ज्या नोटांचे फोटो फिरत आहेत, ते AI - Artificial Intelligence चा वापर करून तयार करण्यात आलेले फोटो आहेत.
DGIPR ने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले?
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ₹१० आणि ₹२० च्या पॉलिमर नोटांसाठी संभाव्य पायलट प्रोजेक्टबाबत केवळ प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. महात्मा गांधी यांचा फोटो हटवून RBI ने नवीन प्लास्टिक नोटा जारी केल्याचा दावा खोटा आहे. RBI ने असा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. व्हायरल झालेला फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.