Pune Crime: बिल्डर अग्रवालच्या मुलाला होणाऱ्या बायकोनं किल्ल्यावरून ढकललं, पण बॉयफ्रेंडमुळं प्लान फसला, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Pune Ketan Agarwal Killed Case: पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची हत्या झाल्याचे तपासातून उघड झाले आहे. या हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी सांगितला आहे.
Pune Crime: बिल्डर अग्रवालच्या मुलाला होणाऱ्या बायकोनं किल्ल्यावरून ढकललं, पण बॉयफ्रेंडमुळं प्लान फसला, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Pune CrimeSaam Tv
Published On
  • लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्या केतन अग्रवालची हत्या झाल्याचे उघड

  • केतन अग्रवालला होणारी बायको सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने मारलं

  • फोटो काढण्याच्या बहाण्याने त्याला दरीत ढकललं

  • आरोपींनी आधीच लोहगड परिसराची रेकी करून खुनाचा कट रचला होता

अक्षय बडवे, पुणे

होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा ४०० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. किल्ल्यावर सेल्फी काढत असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो घसरुन खाली पडला, गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा दावा यापूर्वी करण्यात आला होता. मात्र आता या घटनेत एक खळबळजनक माहिती निष्पन्न झालीय. होणाऱ्या बायको नेच संबंधित तरुणाला दरीत ढकलले होते अशी मन हेलावून टाकणारे वास्तव समोर अधोरेखित झालं आहे. केतन अग्रवाल असे या तरुणाचे नाव आहे तर सिया गोयल (२०) असे त्याच्या प्रेयसी चे नाव आहे.

गडारून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आल्यामुळे पोलिस सुद्धा चक्रावून गेले आहेत. केतन अग्रवाल (२५) चा होणाऱ्या पत्नीनेच मित्राच्या मदतीने दरीत ढकलून खून केल्याच पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतन विशाल अग्रवाल पुण्याजवळील गहुंजे येथील रहिवासी असून एका रिअल इस्टेट कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होता. घटनेच्या वेळी त्याच्यासोबत होणारी पत्नी आणि दोन मित्र होते. होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरी करण्यासाठी त्यांनी लोहगड येथे जाण्याचा प्लॅन बनवला मात्र हा प्लॅन केतन चा शेवटचा ठरला. गुरुवारी तीन तासांच्या परिश्रमानंतर केतनचं पार्थिव लोहगड परिसरातील घनदाट झाडीतून बाहेर काढलं गेलं.

मित्राच्या मदतीने केतन ला किल्ल्यावरून दिलं ढकलून -

सुरुवातीला या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद झाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना काही माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली आणि हा सगळा प्रकार संशियी वाटू लागला. तांत्रिक यंत्रणा आणि गोपनीय माहितीच्या आधारे निष्पन्न झालं की केतन आणि सिया चे भांडण झाले होते. सिया ला केतन सोबत लग्न करायचे नव्हते.

या प्रकरणातील तिसरी व्यक्ती चेतन नावाची होती ती म्हणजे चेतन चौधरी जो सियाचा मित्र होता. चेतन आणि सियाने केतन अग्रवालला मारण्याचा कट शिकवला. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून सिया आणि चेतनने लोहगड किल्ल्याची सुद्धा रेकी केली होती. १८ तारखेला केतन आणि सिया हे दोघे आधी लोहगड किल्ल्यावर गेले. तिथून फिरून झाल्यावर सिया केतन याला एका उंच पॉइंट वर घेऊन गेली. तिथे अचानक पाठीमागून आलेल्या चौधरी ने केतनला धक्का दिला आणि केतन थेट दरीत कोसळला आणि यात त्याचा मृत्यू झाला. आपल्या भोवती तपासाची चक्र फिरू नये म्हणून सिया ने हा अपघात असल्याची बतावणी केली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

अग्रवाल, गोयल आणि चौधरी हे तिन्ही कुटुंब प्रसिद्ध व्यावसायिक -

सिया गोयल या मार्केटयार्डातील मसाल्याचे मोठे व्यापारी असलेल्या गोयल यांची मुलगी तर केतन हा विशाल अग्रवाल या व्यावसायिकाचा मुलगा आहे. या दोघांचे जयपूर येथे मोठा विवाहसोहळा पार पाडला होता. इतकच काय तर प्रवासासाठी दोन विमानं सुद्धा बुक करण्यात आली होती. तसेच सिया चा मित्र चेतन चौधरी हा सुद्धा व्यावसायिक असून त्याचे सुद्धा पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दुकानं आहेत. काही दिवसांपूर्वी सिया गोयल ने स्वतःचा व्यवसाय केला होता.

बालीमध्ये ठरलेल्या प्री-वेडिंगला सियाचा नकार -

सिया आणि केतन चे काही दिवसांमध्ये लग्न ठरले होते. यासाठी प्री-वेडिंग फोटोशूट करण्याची जागा इंडोनेशिया मधील बाली हे बेट निवडलं मात्र ज्याच्यासोबत संसार च करायचा नाही त्याच्यासोबत फोटो कशाला काढायचे म्हणून सिया ने बाली ला न जाण्यासाठी आणि प्लॅन रद्द होण्यासाठी शक्कल लढवली. बाली चे तिकीट बुक झाले तारीख ठरली मात्र ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी हे दोघे मुंबईला गेले तेव्हा केतन ने त्याचा पासपोर्ट कुठे आहे असं सिया ला विचारलं तेव्हा तिने पासपोर्ट अचानक हरवला असल्याचं सांगितलं मात्र खरी गोष्ट म्हणजे केतन याचा पासपोर्ट तिनेच चोरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com