कतारमधील रास लाफान येथील कारखान्यात स्फोट: १३ कामगारांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश

Qatar Factory Explosion : कतारमधील एका अपघातात भारत आणि पाकिस्तानचे नागरिकत्व असलेल्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ६६ जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही.
Qatar Factory Explosion :
QATAR RAS LAFFAN EXPLOSION: 13 WORKERS DEAD, INDIAN NATIONALS AMONG THE VICTIMSsaam tv
Published On
Summary
  • कतारमधील रास लाफान येथील औद्योगिक कारखान्यात भीषण स्फोट

  • प्राथमिक माहितीनुसार १३ कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश

  • या घटनेत ६६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कतारमधील 'रास लाफान इंडस्ट्रियल सिटी' येथील एका कारखान्यात काम सुरू असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर झालेल्या स्फोटामुळे आग लागून १३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. कतारच्या ऊर्जा मंत्र्यांनी सोमवारी या घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आणि ६६ जण जखमी झाले. आखाती प्रदेशातील ऊर्जा क्षेत्रावर झालेल्या सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी ही एक घटना मानली जातेय.

Qatar Factory Explosion :
कोचिंग सेंटरला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडकीतून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेचा तपास सुरू

अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. दरम्यान ही घटना म्हणजे घातपात किंवा शत्रुत्वाची कृती नसून ती एक दुर्घटना असल्याचेही सांगण्यात येत आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांनंतर ही घटना घडली आहे. या घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या आपल्या १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहवालांनुसार ६६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Qatar Factory Explosion :
Breaking: सी-फूड एक्सपोर्ट कंपनीमध्ये मोठी दुर्घटना, गॅसची गळती होऊन ७ महिला कामगारांचा मृत्यू

कतारमधील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केलंय. 'रास लाफान इंडस्ट्रियल सिटी' येथे काल रात्री (रविवारी) घडलेल्या दुर्दैवी घटनेत बाधित झालेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल कतारमधील भारतीय दूतावासाने शोक व्यक्त केला आहे. दुतावास ते कतारमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून ज्यांनी आपले प्राण गमावले किंवा जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत पुरवली जाईल, असेही दुतावासाकडून सांगण्यात आलाय.

मदतीसाठी भारतीय दुतावासाने हेल्फलाइन नंबर जारी केला आहे. दूतावासाने दिलेल्या संपर्क क्रमांकांमध्ये +९७४-५५६४७५०२ आणि +९७५-५५३८४६८३ या हेल्पलाइन क्रमांकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, cons.doha@mea.gov.in या ईमेलद्वारे संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com