कोचिंग सेंटरला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडकीतून मारल्या उड्या, अनेकजण अडकल्याची भीती

Coaching Centre Fire : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Coaching Centre  Fire
LUCKNOW COACHING CENTRE FIRE: STUDENTS JUMP FROM WINDOWS TO ESCAPE, MANY FEARED TRAPPEDsaam tv
Published On
Summary
  • लखनौच्या अलीगंज भागातील कोचिंग सेंटरला भीषण आग लागली आहे.

  • जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडक्यांतून उड्या मारल्या.

  • अनेकजण आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य सुरू आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील अलीगंज भागात असलेल्या एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागली आहे. आगीने काही वेळेत रौद्र रूप धारण केले. इमारतीमध्ये अनेकजण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहेत. हे कोचिंग सेंटर पूर्णिया क्रॉसिंगजवळ आणि 'पब्लिक सर्व्हिस कमिशन'च्या कार्यालयामागे आहे. कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या खिडकीतून खाली उड्या मारल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Coaching Centre  Fire
एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेनं प्रवाशांची घाबरगुंडी उडाली; जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या अन् दुसऱ्या ट्रेनखाली आले

आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान आगीत काही लोक अडकल्याचे वृत्त आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सुरक्षित ठिकाणी उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार हायड्रोलिक प्लॅटफॉर्म असलेल्या एका गाडीसह अग्निशमन दलाच्या १४ गाड्या आग शमवण्याच्या कामात गुंतल्या आहेत.

Coaching Centre  Fire
Delhi Fire : हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी गेले अन् काळानं झडप घातली; चार्टर्ड अकाउंटंट विवेकसह कुटुंबातील ८ जणांचा होरपळून मृत्यू

एडीसीपी (उत्तर) ट्विंकल जैन आणि जिल्हाधिकारी (DM) विशाख घटनास्थळी पोहोचलेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दल आग नियंत्रणात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. रविवारी अलीगंज परिसरातील एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली. आग लागताच संपूर्ण इमारतीत वेगाने धूर पसरला. हे पाहून स्थानिक नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलाला याची सूचना दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com