Akola : अकोल्यात गौमांस वाहतुकीवरून तणाव, पोलिसांनी आरोपीला सोडल्याचा भाजप आमदारांचा आरोप

Akola News : अकोल्यातील सिंदखेड गावात गौमांस वाहतुकीच्या संशयावरून तरुणाला पकडल्याने तणाव निर्माण झाला आहे. भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शीटाकळी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.
AKOLA BEEF TRANSPORT ROW: BJP MLA HARISH PIMPALE QUESTIONS POLICE ROLE, SP DENIES ALLEGATIONS
AKOLA BEEF TRANSPORT ROW: BJP MLA HARISH PIMPALE QUESTIONS POLICE ROLE, SP DENIES ALLEGATIONSSaam Tv
Published On
Summary
  • अकोल्यातील गौमांस वाहतुकीच्या संशयावरून एका तरुणाला गौरक्षकांनी पकडलं

  • घटनास्थळी २० ते २५ जणांचा गट पोहोचल्याने परिसरात तणाव

  • भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप केला

  • पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष

अक्षय गवळी, अकोला

राज्यात अवैध गौमांस वाहतुकीचा सुळसुळाट सुरु आहे. अशातच अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड गावात गौमांस वाहतुकीच्या संशयावरून एका तरुणाला गौरक्षकांनी पकडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शीटाकळी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेड गावातील काही गौरक्षकांनी गौमांस वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला अडवून पकडले. यानंतर संबंधित तरुणाने आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावलं. काही वेळातच २० ते २५ जणांचा ग्रुप तिथे आला आणि गौरक्षकांशी वाद घालू लागला. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बार्शीटाकळी पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

AKOLA BEEF TRANSPORT ROW: BJP MLA HARISH PIMPALE QUESTIONS POLICE ROLE, SP DENIES ALLEGATIONS
Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

आमदार हरीश पिंपळे यांनी आरोप केला की, पोलिसांच्या उपस्थितीत मोठा वाद सुरू असतानाही संबंधित तरुणावर तत्काळ कारवाई करण्यात आली नाही. उलट, गौरक्षकांवरच कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, गौमांस वाहतूक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सोडून दिल्याचा आणि त्याच्याकडील मालही परत दिल्याचा आरोप त्यांनी केला.

AKOLA BEEF TRANSPORT ROW: BJP MLA HARISH PIMPALE QUESTIONS POLICE ROLE, SP DENIES ALLEGATIONS
Rain Alert : राज्यात पावसाच्या मुसळधारा, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

साम टीव्हीशी बोलताना पिंपळे म्हणाले की, घटनास्थळी आलेल्या काही तरुणांच्या हातात लोखंडी पाईप होते आणि ते दादागिरी करत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

AKOLA BEEF TRANSPORT ROW: BJP MLA HARISH PIMPALE QUESTIONS POLICE ROLE, SP DENIES ALLEGATIONS
Coaching Centre Fire : अग्नितांडव! कोचिंग क्लासला भीषण आग; १५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू

दरम्यान, अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित तरुणाला सोडून देण्यात आले नव्हते. घटनास्थळी सुमारे १५० हून अधिक लोकांची गर्दी जमल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी त्याला पोलिसांच्या देखरेखीखाली पुढे रवाना करण्यात आले होते. संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान पोलिसांच्या पुढील चौकशी आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com