Rain Alert : राज्यात पावसाच्या मुसळधारा, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra Weather Update News : राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकणातील भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
MAHARASHTRA MONSOON ACTIVE AGAIN: ORANGE ALERT IN VIDARBHA, YELLOW ALERT FOR MUMBAI AND KONKAN
MAHARASHTRA MONSOON ACTIVE AGAIN: ORANGE ALERT IN VIDARBHA, YELLOW ALERT FOR MUMBAI AND KONKANSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात दोन आठवड्यांनंतर मान्सून पुन्हा सक्रिय

  • विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट

  • मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता

  • पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Maharashtra Weather Update News राज्यात गेल्या २ आठवड्यांपासून रखडलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल सकाळपासूनच मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. आज विदर्भात उष्ण हवामान आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबईसह कोकणात जोरदार सरींची आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान मुंबईसाठी पुढील काही तास महत्त्वाचे असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात मॉन्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून अनेक भागांत पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील (Vidarbha Rain Update) वर्धा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण हवामानासोबत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

MAHARASHTRA MONSOON ACTIVE AGAIN: ORANGE ALERT IN VIDARBHA, YELLOW ALERT FOR MUMBAI AND KONKAN
Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

दरम्यान, कोकण (Kokan Rain Update) किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai Rain Update), ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. याशिवाय सातारा जिल्ह्यातही मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

MAHARASHTRA MONSOON ACTIVE AGAIN: ORANGE ALERT IN VIDARBHA, YELLOW ALERT FOR MUMBAI AND KONKAN
Monsoon Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'या' तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाची मोठी अपडेट

राज्यातील (Maharashtra Monsoon Update) उर्वरित भागांतही तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचे IMD ने सांगितले आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. मॉन्सून हळूहळू सक्रिय होत असल्याने येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com