Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

Pune Husband Killed Wife: पुण्यातील खराडीमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या केली. झोपलेल्या बायकोच्या डोक्यात नवऱ्याने गॅस सिलिंडर टाकला.
Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला
Pune Crime Saam Tv
Published On
  • पुण्यातील खराडी परिसरात हत्याकांडाची भयंकर घटना घडली

  • नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली

  • झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात गॅस सिलिंडर टाकला

  • हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बायकोचा मृत्यू

  • आरोपी फरार असून पोलिस शोध घेत आहेत

पुण्यामध्ये कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरात बुधवारी ही घटना घडली. नवऱ्याने झोपलेल्या बायकोच्या डोक्यात गॅस सिलिंडरच्या सहाय्याने हल्ला करत तिला जागीच संपवलं. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. बायकोची हत्या करून आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण दयाराम बाबर (वय ३२ वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. तर दयाराम तोताराम बाबर (वय ३६ वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. हे नवरा-बायको खराडीतील भनगाई वस्तीत राहत होते. हे जोडपे मूळचे मध्य प्रदेशचे असून कामानिमित्त पुण्यात राहत होते. बाबर दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे.

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला
Raigad Crime: रायगड हादरले! कुंडलिका नदीत उडी मारून महिलेनं आयुष्य संपवलं

दयाराम खराडी येथे सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तर किरण घरकाम करायची आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास किरण गाढ झोपेत होती. त्यावेळी दयाराम तिथे आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. या भांडणादरम्यान रागाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात गॅस सिलिंडरने हल्ला केला.

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला
Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

या हल्ल्यात किरण गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी झालेल्या किरणला तिचा भाऊ दादू सजन बोरसेने रुग्णालयात नेले. पण उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बायकोची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किरणचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे खराडी परिसरात एकच खळबळ उडाली.

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला
Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com