Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर

Vilas Ghule Case: बीडमध्ये विलास घुले या हॉटेल व्यवसायिकाची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर
Vilas Ghule CaseSaam TV
Published On
  • विलास घुले हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट

  • हत्याकांडाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला

  • ८ ते ९ जणांनी हॉटेलबाहेर विलासवर हल्ला केला

  • उपचारादरम्यान विलासचा मृत्यू झाला होता

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल मालक विलास घुले याची ८ ते ९ जणांनी चाकूचे वार करून हत्या केली होती. या हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये तणावाचे वातावरण आहे. या हत्याकांड प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. विलास घुलेला कशापद्धतीने मारण्यात आले हे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

विलास घुले हा अनैतिक संबंधातून सुरू असलेल्या वादात पडला होता. यानंतर आरोपी आणि विलास घुलेमध्ये वाद सुरू झाला. विलासच्या हॉटेलबाहेरच त्याची हत्या करण्यात आली. हॉटेलबाहेर आरोपींमधील एका व्यक्तीने त्याच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलासला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. या वादाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून दोन गटात हाणामारी होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर
Beed Crime: माझ्या बहिणीचा नाद सोड...; तरुणावर जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार अन् लोखंडी रॉडने मारहाण

विलास घुलेच्या हत्येनंतर त्याचे कुटुंबीय आणि गावकरी आक्रमक झाले. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गेले ३ दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. काल विलास घुले यांचा मृतदेह ९ तास पोलिस ठाण्यासमोर ठेवण्यात आला होता. रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतल्याची माहिती दिली.

यावेळी आंदोलकांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. यानंतर रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. तसेच या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी उपस्थित नातेवाईकांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आणि विलासच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर
Beed News: पोहायला गेला अन् परतलाच नाही! परळीत तरुण बेपत्ता

या हत्याकांड प्रकरणामुळे खासदार बजरंग सोनावणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बजरंग सोनावणे यांच्या मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. यासंदर्भात बजरंग सोनावणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मुलाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. तसंच, विनाकारण चुकीच्या पद्धतीने दबाव आणला जात असून आमची बदनामी केली जात असल्याचा आरोप बजरंग सोनावणे यांनी केला आहे.

Beed Crime: हॉटेलबाहेर ८ ते ९ जणांकडून हल्ला, पोटात चाकू भोसकला; विलास घुले हत्याकांडाचा थरारक VIDEO समोर
Beed Crime: खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मुलाचं नाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com