Beed Crime: खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मुलाचं नाव

Beed Vilash Ghule Case: बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आले आहे.
Beed Crime: खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मुलाचं नाव
Beed Vilash Ghule CaseSaam Tv
Published On
  • बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण

  • खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणेचे नाव समोर

  • याप्रकरणी ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल

  • या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

योगेश काशिद, बीड

बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या हत्या प्रकरणात दिलेल्या जबाबात खासदारपुत्र सौरभ सोनवणे याचं नाव समोर आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. सौरभ सोनवणे याचा या प्रकरणात पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला. या खुलाशामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जबाबातील या उल्लेखामुळे तपास यंत्रणांसमोर अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार बजरंग सोनवणे यांच्या सौरव सोनवणे या मुलाचे पुरवणी जबाबत नाव आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. तपासात काही निष्पन्न न झाल्यास नाव वगळले जाणार आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव पुरवणी जबाबदार घेतल्यामुळे अडचणीत वाढ होणार आहे. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण लागले असून या हत्या प्रकरणांमध्ये काल दिवसभर नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक केज पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते.

Beed Crime: खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मुलाचं नाव
Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

विलास घुले प्रकरणात बजरंग सोनवणे यांच्या मुलावर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र बजरंग सोनवणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, विनाकारण चुकीच्या पद्धतीने दबाव आणला जात असून आमचा त्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही सीडीआर चेक करा सीसीटीव्ही चेक करा जे करायचे ते करा दोषी निघाल्यास कारवाई करा. मात्र या प्रकरणात अद्यापपर्यंत ९ आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरा विलास घुलेचा मृतदेह नातेवाईकांकडून ताब्यात घेण्यात आला असून पोलिस अधीक्षक नवनीत कावत हे पोलिस ठाण्यामध्ये तळ ठोकून होते.

Beed Crime: खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मुलाचं नाव
Beed Crime: तू माझ्याशी का नाही बोलत? चारित्र्याच्या संशयावरून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घरात घुसून चाकूने सपासप वार, परळी हादरले

पोलिस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलिस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन गेल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणांमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा पुरवणी जबाबामध्ये नाव घेण्यात आले आहे. यामुळे बजरंग सोनवणे यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार असल्यास बोलले जात आहे. त्याचबरोबर पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी काय समोर येते आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जे खरे असेल ते समोर येईल. जे चुकीच्या पद्धतीने कोणी जर करत असेल तर तुमच्यावर ही कारवाई करण्यात येईल.

Beed Crime: खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ, बीडच्या विलास घुले हत्या प्रकरणात मुलाचं नाव
Beed Crime: माझ्या बहिणीचा नाद सोड...; तरुणावर जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार अन् लोखंडी रॉडने मारहाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com