पुण्यात पहाटेच गोळीबाराचा थरार! पोलिस-गुन्हेगार आमने-सामने; नेमकं काय घडलं?

Pune Wanowrie Police Encounter Early Morning Details: पुण्यातील वानवडी परिसरात पहाटे पोलिस आणि सराईत गुन्हेगारामध्ये चकमक झाली. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Injured criminal being shifted to Sasoon Hospital after a police encounter in Pune’s Wanowrie area
Injured criminal being shifted to Sasoon Hospital after a police encounter in Pune’s Wanowrie areasaam tv
Published On

पुण्यातील वानवाडी परिसरात आज रविवारी पहाटेच्या सुमारास पोलीस आणि एका सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला पकडताना झालेल्या झटापटीत, आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षनार्थ प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला आहे. या घटनेत एक पोलीस अधिकारी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. करण सिंग असे गोळीबारात जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Injured criminal being shifted to Sasoon Hospital after a police encounter in Pune’s Wanowrie area
Sunday Mega Block : रेल्वे प्रवाशांनो, गरज असेल तरच लोकल प्रवास करा, मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या कुठे आणि कधी?

पोलिसांचा सापळा अन् आरोपीचा हल्ला

वानवडी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक महितीनुसार, हा संपूर्ण प्रकार आज पहाटे 5.30 ते 6.00 वाजण्याच्या सुमारास वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. 30 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेला एक सराईत गुन्हेगार वानवडी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या महितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला होता.

Injured criminal being shifted to Sasoon Hospital after a police encounter in Pune’s Wanowrie area
Dombivli News : राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; डोंबिवलीत मनसैनिक आक्रमक, थेट पोलीस ठाण्यावर धडकले

पहाटेच्या सुमारास आरोपी पोलिसांना दिसताच, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. मात्र स्वतःला पोलिसांच्या विळख्यात अडकेलेल पाहून आरोपीने त्याच्या जवळील अग्निशास्त्राने पोलिसांच्या दिशेने थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली.

अधिकाऱ्याने झाडली गोळी

आरोपीने अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे पोलिसांनी तात्काळ पवित्रा घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ आरोपीच्या दिशेने गोळी झाडली. या चकमकीत आरोपी करण सिंग याला गोळी लागल्याने तो जखमी झाला, तर झटापटीत आणि गोळीबारात एक पोलीस अधिकारीही किरकोळ जखमी झाले.

Injured criminal being shifted to Sasoon Hospital after a police encounter in Pune’s Wanowrie area
Operation Tiger: ठाकरेंचे 6 खासदार अपात्र ठरणार का? डॉ.अनंत कळसेंनी काय सांगितलं?

ससून रुग्णालयात उपचार सुरू

घटनेनंतर पोलिसांनी जखमी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे वानवडी आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com