Sunday Mega Block : रेल्वे प्रवाशांनो, गरज असेल तरच लोकल प्रवास करा, मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या कुठे आणि कधी?

Mumbai local mega block on central and harbour lines : रेल्वे प्रशासनाने मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. हा मेगाब्लॉक कधी आणि किती वाजता घेतला जाणार आहे, जाणून घ्या.
मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Railway Mega block on Sunday May 31 saam tv
Published On

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून नेहमीप्रमाणेच रविवार, ३१ मे रोजी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तसेच कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे.

मध्य रेल्वेवरील अनेक उपनगरीय स्थानकांवर विविध कामं सुरू आहेत. दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. या मेगाब्लॉकच्या कालावधीत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येतात. बऱ्याचदा नेहमीप्रमाणे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. या मेगाब्लॉकच्या कालावधीत लोकल गाड्यांचे मार्ग बदलण्यात येतात, तर काही ठिकाणी लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतला जातो. नेहमीप्रमाणे येत्या रविवारी देखील मेगाब्लॉक घेण्यात आला असून, विविध देखभालीची कामे या कालावधीत केली जाणार आहेत.

या मेगाब्लॉकच्या कालावधीत मुख्य मार्गावरील विविध सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ पासून दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा CSMT आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन दोन्ही मार्गांवरील उपनगरीय लोकल मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बरवर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
CSMT स्टेशन फलाट विस्ताराच्या कामाचा कालावधी वाढला; अनेक गाड्यांचा शेवटचा थांबा बदलला, कोणती ट्रेन कुठे थांबणार?

या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी – पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Central Railway Update : मध्य रेल्वे विस्कळीत, डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; नोकरदारवर्गाला लेटमार्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com