CSMT स्टेशन फलाट विस्ताराच्या कामाचा कालावधी वाढला; अनेक गाड्यांचा शेवटचा थांबा बदलला, कोणती ट्रेन कुठे थांबणार?

CSMT platform News : CSMT स्टेशनच्या विस्ताराच्या कामाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अनेक गाड्यांचा शेवटचा थांबा बदलण्यात आला आहे.
megablock
csmt railway station Saam tv
Published On
Summary

मुंबईतील CSMT रेल्वे स्टेशनच्या पुर्नविकास काम जोरात

स्टेशनच्या फलाट क्रमांक १६ आणि १७ च्या कामासाठी विशेष ब्लॉक

ब्लॉकमुळे प्रवाशांची १० दिवस होणार गैरसोय

मुंबईतील CSMT रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचं काम सुरू आहे. स्टेशनच्या फलाट क्रमांक १६ आणि १७ चे हे काम सुरू आहे. या कामाचा कालावधी आणखी १० दिवसांनी वाढवला आहे. त्यामुळे काही ट्रेनचा शेवटचा थांबा बदलण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना तब्बल १० दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.

megablock
पुण्याला मिळाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, कुठून कुठे धावणार? थांबे कोणते? A टू Z माहिती

मुंबईतील दररोज प्रवाशांची वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनचं पुनर्विकास काम सुरू आहे. या स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला मुदतवाढ देण्यात आलीये. या कामामुळे काही मेल/एक्स्प्रेच्या शेवटच्या थांब्यात बदल करण्यात आले आहेत.

रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होणार असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वे पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ वर पायाभूत कामे तसेच इतर आवश्यक कामे पूर्ण केली जातील.

megablock
Railway News : गुड न्यूज! रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी जलद होणार; पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेबाबत महत्वाची अपडेट समोर

२९.०५.२०२६ पासून सुरू होणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या १० दिवसांच्या कालावधीसाठी शॉर्ट टर्मिनेट होणार

दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस

बिदर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

लातूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस

बल्लारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस

megablock
Railway News : गुड न्यूज! रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी जलद होणार; पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेबाबत महत्वाची अपडेट समोर

ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिकीकरणासाठी हे ब्लॉक कालावधित केले जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com