पुण्याला मिळाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, कुठून कुठे धावणार? थांबे कोणते? A टू Z माहिती

Pune To Ajmer Weekly Express Train Full Schedule And Stops: पुणे-दौंड ते अजमेर दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली असून संपूर्ण मार्ग, थांबे, वेळापत्रक आणि डब्यांची माहिती जाणून घ्या.
New Daund–Ajmer Weekly Express Train launched by Central Railway connecting Maharashtra to Rajasthan.
New Daund–Ajmer Weekly Express Train launched by Central Railway connecting Maharashtra to Rajasthan.saam tv
Published On

मध्य रेल्वेने दौंड आणि अजमेर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीचे नियमित सेवा सुरू केली असून 22 मे पासून ही गाडी नव्या क्रमांकाने साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावण्यास सुरूवात होणार आहे. गाडी क्रमांक 20992 अंतर्गत दौंड-अजमेर साप्ताहीक एक्सप्रेस दर शुक्रवारी रात्री 11.10 वाजता दौंडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12.40 मिनिटांनी अजमेरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 20991 अंतर्गत अजमेर-दौंड एक्सप्रेस दर गुरुवारी 4.45 वाजता अजमेरहून निघेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7.10 वाजता दौंडला दाखल होईल.

New Daund–Ajmer Weekly Express Train launched by Central Railway connecting Maharashtra to Rajasthan.
Pune Fraud: थायलंड टुरचा मोह महागात पडला, पुण्यातील ट्रॅव्हल्स कंपनीला लाखोंचा गंडा; प्रकरण काय?

कुठे कुठे थांबणार?

पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, गोधरा, दाहोद, रतलाम, नागदा, भवानीमंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, जयपूर आणि किशनगड येथे थांबे असतील.

New Daund–Ajmer Weekly Express Train launched by Central Railway connecting Maharashtra to Rajasthan.
Dombivli : डोंबिवलीतील 29 कुटुंबांची चिंता वाढली! इमारत रिकामी करण्याची नोटीस, रहिवाशांची केडीएमसीत धाव

गाडीच्या संरचनेत १वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC Second Class), ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी, (6 AC Third Class), ७ शयनयान(7 Sleeper), २ सामान्य द्वितीय श्रेणी डबे (2 General Second Class) आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनचा (2 Guard’s Brake Vans) समावेश आहे. दिनांक ४ जून २०२६ पासून शयनयान डब्यांची संख्या ७ वरून ५ वर येईल, तर सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे २ वरून ४ करण्यात येतील.प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com