Mothers Day 2026: मदर्स डे निमित्त आईला कामातून द्या ब्रेक आणि पाहा 'हे' खास चित्रपट

Shruti Vilas Kadam

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे

आई आपल्या मुलांसाठी किती मोठा संघर्ष करू शकते, हे या चित्रपटातून भावनिक पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. परदेशी कायद्याविरोधातील एका आईची हृदयस्पर्शी लढाई प्रेक्षकांना भावूक करते.

Mothers Day 2026 | Pintrest

मॉम

श्रीदेवी यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट एका आईची आपल्या मुलीसाठीची संघर्षमय लढाई दाखवतो.

Mothers Day 2026 | Pintrest

इंग्लिश विंग्लिश

श्रीदेवी यांच्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटात घरासाठी सतत झटणाऱ्या आईची भावना आणि तिचा आत्मविश्वास या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

Mothers Day Movie | Pintrest

सिक्रेट सुपरस्टार

अमिर खान निर्मित सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटात आई-मुलीच्या नात्याची भावनिक कहाणी सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. आईचं समर्थन मुलाच्या यशासाठी किती महत्त्वाचं असतं हे यात दाखवलं आहे.

Mothers Day 2026 | Pintrest

पा

अमिताभ बच्चन यांच्या पा या चित्रपटात आई आपल्या मुलासाठी किती मोठा आधार असते हे हृदयस्पर्शी पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.

Mothers Day 2026 | Pintrest

नील बट्टे सन्नाटा

स्वरा भास्करचा नील बट्टे सन्नाटा मुलीच्या शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या आईची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पाहायला मिळते. आईची मेहनत आणि त्याग यात प्रभावीपणे दाखवला आहे.

Mothers Day 2026 | Pintrest

मिमी

कृती सॅननचा मिमी हा चित्रपट मातृत्व, त्याग आणि प्रेम या भावनांवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिक अनुभव देतो.

Mothers Day 2026 | Pintrest

Trendy Simple Mangalsutra: ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करा लाइटव्हेट आणि साधे ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स

Office Wear Mangalsutra Designs | Pintrest
येथे क्लिक करा