Pune Fraud: थायलंड टुरचा मोह महागात पडला, पुण्यातील ट्रॅव्हल्स कंपनीला लाखोंचा गंडा; प्रकरण काय?

Pune Fraud Crime: थायलंड टुरच्या नावाखाली पुण्यातील एका ट्रॅव्हल्स कंपनीला तब्बल १३ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
Pune Fraud Crime
Pune Fraud CrimeSaamtv
Published On

अक्षय बडवे, पुणे | ता. ८ डिसेंबर २०२३

Pune Fraud News:

थायलंड टुरच्या नावाखाली पुण्यातील एका ट्रॅव्हल्स कंपनीला तब्बल १३ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थायलंड टूरकरिता प्रवाशांसाठी विमानाची तिकिटे आणि विझा देण्याचे आश्वासन देऊन तिकीट न देता कंपनीची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ट्रॅव्हल कंपनीच्या एका व्यक्तीवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समोर आलेली माहिती अशी की, थायलंड टुरच्या नावाखाली पुण्यातील एका ट्रॅव्हल्स कंपनीला तब्बल १३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात घडला. ट्रॅव्हल कंपनीमार्फत एजंट लोकांकरीता मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये बँकॉक आणि थायलंड येथे टूर करिता प्रवाशांची विमानाची तिकिटं, विझा या गोष्टींची पूर्तता करण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते.

त्याकरिता त्याने कंपनीकडून जवळपास नऊ लाख रुपये ऍडव्हान्स घेतले. एजन्सीच्या नातेवाईकांनाही टूरला घेऊन जातो असे सांगून त्यांच्याकडूनही चार लाख रुपये उकळले पण त्या बदल्यात कोणत्याही तिकीट न देता फिर्यादीच्या कंपनीचा एजंटच्या नातेवाईक व मित्रांची अशी एकूण तेरा लाख रुपयांची फसवणूक केली.

Pune Fraud Crime
Maratha Reservation: विरोधकांनो मराठा आरक्षणाचे राजकारण करू नका; विधानभवन परिसरात झळकले बॅनर्स, नागपुरात वातावरण तापणार?

यात बनावट आरटीजीएस स्लिप, धनादेश बनून रक्कम दिल्याचे भासवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी दर्शन ध्रुव नावाच्या व्यक्तीवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Fraud Crime
Pune Cyber Fraud: पुण्यातील ऑनलाइन पेमेंट कंपनीला घातला ३.५ कोटींचा गंडा; २ सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com