Maratha Reservation: विरोधकांनो मराठा आरक्षणाचे राजकारण करू नका; विधानभवन परिसरात झळकले बॅनर्स, नागपुरात वातावरण तापणार?

Maratha Reservation News: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा युवा सेनेकडून विधान भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Maratha Reservation Nagpur Banners
Maratha Reservation Nagpur Banners Saam TV
Published On

Maratha Reservation Nagpur Banners

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा युवा सेनेकडून विधान भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली असून २३ मार्च १९९४ बद्दल बोला असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation Nagpur Banners
Water Crisis: राज्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट, धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; अनेक शहरांत पाणीकपातीला सुरुवात

मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. २४ डिसेंबरच्या आत आरक्षणाबाबत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत येऊन आंदोलन करू, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. यावरून भुजबळ आणि जरांगे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.

अशातच नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना मराठा समाजाकडून विधिमंडळ परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. विरोधकांनो मराठा आरक्षणाचे राजकारण करू नका. ६० वर्ष मराठ्यांना आरक्षणापासून वंचित का ठेवलं? याचा हिशेब द्या, तसंच २३ मार्च १९९४ बद्दल बोला, असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे.

दरम्यान, आरक्षणावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद सुरूच आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की छगन भुजबळांचा कार्यक्रमच करतो, असा अप्रत्यक्ष इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Maratha Reservation Nagpur Banners
Rain Alert: मिचाँग चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल; महाराष्ट्रासह १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार, IMD अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com