Rain Alert: मिचाँग चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल; महाराष्ट्रासह १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार, IMD अंदाज

Maharashtra Rain Alert: येत्या २४ तासांत महाराष्ट्रासह, १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain AlertSaam TV
Published On

Weather Updates in Maharashtra

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर मिचाँग चक्रीवादळात झालं. या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. डोंगराळ भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे. यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Rain Alert
Maharashtra Politics: निवडणूक प्रचारात धर्माच्या नावाने मतं मागायची का? ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासांत महाराष्ट्रासह, १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही राज्यांमध्ये गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

मिचाँग चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना चांगलाच तडाखा दिला. चेन्नईत अतिमुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे. या पावसाने आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला आहे. मुसळधार पावसाने चेन्नईतील जनजीवन विस्कळीत आहे.

कोणकोणत्या राज्यांना अलर्ट?

स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, आज ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढू शकतो. पुढील ४८ तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडू शकतो.

झारखंड, बिहारचा काही भाग, दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही प्रमाणात हलका पाऊस पडेल. ८ आणि ९ डिसेंबरला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert
Ravikant Tupkar: सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा... रविकांत तुपकरांचा थेट इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com