Pune Cyber Fraud: पुण्यातील ऑनलाइन पेमेंट कंपनीला घातला ३.५ कोटींचा गंडा; २ सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक

Pune Fraud News: ऑनलाइन पेमेंट कंपनीची तब्बल ३.५ कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. या प्रकरणी दोघा सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
Cyber fraud
Cyber fraudSaam tv
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. ८ डिसेंबर २०२३

Pune Cyber Crime News:

ऑनलाइन पेमेंट कंपनीची तब्बल ३.५ कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. या प्रकरणी दोघा सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी आणि आयुब बशिर आलम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागरिकांना ऑनलाइन पेमेंटची सुविधा देणाऱ्या येरवडा येथील इझी-पे प्रा.लि. कंपनीची ३.५ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. इझी-पे चे नोंदणीकृत एजंटांच्या माध्यमातून कंपनीचे कामकाज चालते. या कंपनीतील नोंदणीकृत एजंटांपैकी ६५ जणांनी संगनमत करून कंपनीच्या वेबपोर्टल अॅपव्दारे फसवणूक केल्याचे समोर आले होते.

आरोपींनी अनधिकृत मोबाईल संचांद्वारे कंपनीच्या तांत्रिक सुविधांचा गैरवापर केला. तसेच कंपनीच्या खात्यामधून एजंटच्या कमिशनव्यतिरिक्त तीन कोटी ५२ लाख ७० हजार रुपयांची रक्कम इतर ४४ बँक खात्यांत जमा करून फसवणूक केली. याबाबत पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyber fraud
Rain Alert: मिचाँग चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल; महाराष्ट्रासह १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार, IMD अंदाज

या प्रकरणी सायबर पोलिसांनी २ आरोपींना आधीच अटक केली होती. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून पुणे सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. परंतु आरोपी दिल्ली, बिहार येथून पश्चिम बंगाल येथे गेल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा माग काढत अन्सारी आणि आलम या दोघांना कोलकतामधून ताब्यात घेतले. न्यायालयाने या दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

Cyber fraud
Indian Navy Officers Qatar: कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ भारतीयांची होणार सुटका? भारत सरकारच्या प्रयत्नांना यश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com