Pune - Mumbai Expressway Accident : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ कारचा टायर फुटून अपघात; ६ प्रवासी जखमी

Pune - Mumbai Express Way Car Accident News Update : पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
Car Accident at Lonavala on Pune - Mumbai Express Way
Car Accident at Lonavala on Pune - Mumbai Express WaySAAM TV
Published On

दिलीप कांबळे, मावळ | 07 डिसेंबर, 2023

Car Accident at Lonavala on Pune - Mumbai Expressway :

पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्याजवळ कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक्स्प्रेस वेवरून कार पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. लोणावळ्याजवळ कारचा पुढचा टायर फुटला. या भीषण अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. (Pune - Mumbai Expressway )

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ब्लॉक

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर 'ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' अंतर्गत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ग्रँट्री उभारण्याच्या कामासाठी आज, गुरुवारी दुपारी १२ ते २ या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला. ग्रँट्री उभारण्याचे काम सुरू आहे.

युद्धपातळीवर हे काम करण्यात येत आहे. या दरम्यान, किवळेमार्गे जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. हा ब्लॉक संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे सांगितले जाते.

Car Accident at Lonavala on Pune - Mumbai Express Way
Toyota EV: 10 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मुंबई-पुणे 6 फेऱ्या मारता येणार; टोयोटा तयार करत आहे सॉलिड-स्टेट बॅटरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com