Shreya Maskar
लोहगड किल्ला सह्याद्री पर्वत रांगेत लोणावळा या हिल स्टेशनपासून अंदाजे 11 किमी अंतरावर आहे. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात ते 1,033 मीटर (3,389 फूट) उंचीवर आहे.
मुंबईहून लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही ट्रेन किंवा बाय रोड असा प्रवास करू नका. येणाऱ्या वीकेंडला येथे नक्की ट्रिप प्लान करा. पावसाळ्यात येथील निसर्ग बहरून येतो.
तुम्ही मुंबईहून ट्रेनने पुण्याला पोहचा. पुणे स्टेशनला आल्यावर तेथून पुन्हा ट्रेन प्रवास करून मळवली रेल्वे स्थानकावर पोहचा. मावळलीपासून लोहगडवाडी गावापर्यंत शेअरिंग रिक्षाने जा.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून लोणावळामार्गे मळवलीला जा. भाजा लेण्यांच्या पुढून लोहगडवाडी गावाकडे जा. लोहगडवाडीपासून लोहगडपर्यंत ट्रेक करावा लागतो.
लोहगडवाडी हे लोहगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. येथून गडमाथ्यापर्यंत जाण्यासाठी साधारण १ ते दीड तास लागतो.
लोहगड किल्ला लोहदुर्ग, लोखंडी किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला अभेद्य लष्करी वास्तुकलेसाठी ओळखला जातो. किल्ल्यावरून निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
लोहगड किल्ला 'विंचूकाटा' (विंचवाच्या नांगीसारखा आकार असलेली नैसर्गिक खडकाळ रचना) यासाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.