Taila Baila Fort : ३,३२२ फूट उंचीवरून शत्रूंवर नजर ठेवणारा 'तैलबैला' किल्ला पाहिलाय का? मुंबईपासून आहे जवळ

Shreya Maskar

तैलबैला किल्ला

पुणे जिल्ह्यातील मुळशी/मावळ भागात 'तैलबैला किल्ला' वसलेला आहे. हे ठिकाण रॉक-क्लायंबिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Tailbaila Fort | google

किल्ल्याची उंची किती?

२५० फूट उंचीच्या दोन उभ्या खडकांच्या भिंती आहेत. तैलबैला किल्ला समुद्रसपाटीपासून ३,३२२ फूट उंचीवर वसलेला आहे.

What is the height of the castle? | google

किल्ला कोणी बांधला?

तैलबैला किल्ला हा आदिलशाही राजवटीने बांधला. शत्रूच्या हालचालींवर आणि आसपासच्या दऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला होता. तैलबैला किल्ल्याची निर्मिती मराठा साम्राज्याच्या काळात झाली.

Who built the fort? | google

किल्ल्याचा आकार

तैलबैला किल्ल्याचा आकार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी आहे. यात २०० ते २५० फूट सरळ वर जाणारे दोन भव्य, समांतर उभे खडक आहेत, ज्यांच्यामध्ये 'V' आकाराची तीव्र दरी आहे. ही अद्वितीय रचना म्हणजे एक 'मॅग्मॅटिक डाइक' आहे.

The size of the fort | google

किल्ल्यावर कसे जाल?

मुंबई टू पुणे ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर पुढे पुणे स्टेशनला उतरून रिक्षा किंवा टॉक्सीने मुळशी येथे जा. तेथून ट्रेक करत तुम्ही किल्ल्यावर पोहचला.

How to get to the castle? | google

साहसी क्रिडा

सह्याद्रीतील रॉक-क्लायंबिंग आणि रॅपलिंगसाठी तैलबैला किल्ला अत्यंत प्रसिद्ध आहे. येथे ट्रेकिंगचा थरार येथे अनुभवता येतो.

Adventure sports | google

ऐतिहासिक महत्त्व

तैलबैला किल्ला मराठा काळात 'सवाशिणी घाट' आणि 'वाघजाई' मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा एक महत्त्वाचा टेहळणी बुरूज म्हणून वापर केला जात असे. किल्ल्यावरून तुम्हाला कोकण प्रदेश आणि आसपासची सह्याद्रीतील शिखरे सुधागड, घणगड आणि सरसगड यांचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Historical significance | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : कोकणातील पावसाळी जादू! रत्नागिरीतील 'ही' ५ ठिकाणे फिरायला अजिबात विसरू नका

Ratnagiri Tourism | saam tv
येथे क्लिक करा...