Ratnagiri Tourism : कोकणातील पावसाळी जादू! रत्नागिरीतील 'ही' ५ ठिकाणे फिरायला अजिबात विसरू नका

Shreya Maskar

मार्लेश्वर बीच

रत्नागिरीपासून सुमारे ६० किमी अंतरावर मार्लेश्वर बीच वसलेला आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य खुलते. येथे उंच आणि हिरव्यागार दरीतून कोसळणारा धबधबा पाहता येतो. येथे भगवान शंकराचे गुहा-मंदिरही आहे.

Marleshwar Beach | google

सावडाव धबधबा

सावडाव धबधबा चिपळूणजवळ आहे. हा धबधबा जवळपास ७० मीटर उंचीवरून कोसळतो. तुम्ही येथे वीकेंडला मित्रांसोबत ट्रिप प्लान करू शकता.

Savdav Waterfall | google

खोरनिनको धरण

रत्नागिरीपासून सुमारे ६० किमी अंतरावर खोरनिनको धरण आहे. मातीचे धरण उंच-सखल टेकड्यांनी वेढलेले आहे. मुसळधार पावसात येथील पाण्याचे प्रवाह पायऱ्यांसारख्या रचनेवरून खाली ओसंडून वाहतात, ज्यामुळे हे दृश्य अत्यंत नयनरम्य बनते.

Khorninko Dam | google

थिबा पॅलेस

थिबा पॅलेस ब्रिटिश सरकारने 1910 मध्ये बांधला होता. तिसऱ्या अँग्लो-बर्मी युद्धानंतर म्यानमारचा (पूर्वीचा बर्मा) शेवटचा सम्राट राजा थिबाव मिन यांचे अधिकृत निवासस्थान आणि नजरकैदेचे ठिकाण म्हणून हे बांधले गेले.

Thiba Palace | google

जयगड किल्ला

शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते, अशा एका कड्यावर जयगड किल्ला वसलेला आहे. किल्ल्याची प्राचीन तटबंदी भक्कम आहे. जवळच्या दीपगृहाचे (लाईटहाऊसचे) धुक्यातील दृश्य मनाला भुरळ घालते.

Jaigad Fort | google

मांडवी बीच

मांडवी बीच 'रत्नागिरीचे प्रवेशद्वार' म्हणून ओळखला जातो. संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी येथे नक्की जा. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Mandvi Beach | google

आंबा घाट

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा घाट आहे. पावसाळ्यात रोड ट्रिपासाठी हे बेस्ट लोकेशन आहे. दाट धुके आणि कड्यांवरून खाली कोसळणारे धबधबे पाहून तुम्ही वेडे व्हाल.

Amba Ghat | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : चाळीसगावपासून हाकेच्या अंतरावरील ५ किल्ले, सुट्टीत करा इतिहासाची सफर

Chalisgaon Fort | saam tv
येथे क्लिक करा...