Shreya Maskar
चाळीसगाव हे जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. हे ठिकाण पश्चिम घाटातील हिरव्यागार टेकड्या आणि तितूर नदीच्या सान्निध्यात वसलेले आहे. चाळीसगाव हे अजिंठा आणि सातमाळा पर्वत रांगांचे प्रवेशद्वार मानले जाते, त्यामुळेच येथील गिरीदुर्गांना नक्की भेट द्या.
कन्नड घाटाच्या रांगांमध्ये आणि शहरापासून साधारण १५ किमी अंतरावर मल्हारगड किल्ला वसलेला आहे. येथे सुस्थितीत असलेले बुरूज, ब्रिटिशकालीन विहीर आणि वनविभागाचा आधुनिक निरीक्षण मनोरा (वॉचटावर) पाहायला मिळतात.
कण्हेरगड हा किल्ला चाळीसगावपासून सुमारे १८ किमी अंतरावर स्थित आहे. गौताळा औट्रमघाट अभयारण्याच्या निसर्गरम्य परिसरात २,२५० फूट उंचीवर वसलेला हा एक आव्हानात्मक गिरीदुर्ग आहे.
भोपेवाडीजवळ स्थित असलेला अंतूर किल्ला हा गिरीदुर्ग आपल्या उंच स्थानावरून दिसणाऱ्या विहंगम दृश्यांसाठी, तटबंदीच्या अवशेषांसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे.
नाशिक-जळगाव सीमेजवळील अजिंठा पर्वतरांगेत राजदेहेर किल्ला वसलेला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी राजदेहेर वाडी गावापासून मध्यम स्वरूपाची ट्रेक करावी लागते.
सीमावर्ती भागातील सातमाळा पर्वतरांगेत इंद्रई किल्ला आहे. किल्ल्याच्या जवळच 'पाटणा देवी' मंदिर आहे.
चाळीसगावच्या अगदी जवळ रुईखेड्याजवळ पन्हाळगड किल्ला वसलेला आहे. आजूबाजूच्या टेकड्यांचे विहंगम दृश्य दिसते. ट्रेकिंगसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.