Shreya Maskar
जिंजी किल्ल्याला 'सेंजी किल्ला' असेही म्हणतात. हा तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील एक प्राचीन ऐतिहासिक ठिकाण आहे. जो तीन टेकड्यांवर (राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रायनदुर्ग) पसरलेला आहे.जिंजी किल्ल्याजवळील ५ सुंदर हिल स्टेशन्स पाहूया.
पूर्व घाटात वसलेले येलागिरी हे एक शांत थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण गुलाबाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. जिंजीपासूनचे सुमारे १२५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. येथे पुंगानूर लेक पार्क, स्वामीमलाई हिल्स, नेचर पार्क आणि जलगामपराई धबधबा पाहायला मिळतात.
जवादू हिल्सला जावडी हिल्स देखील म्हणतात. येथे दाट हिरवळ, खोल दऱ्या आणि वळणावळणाचे रस्ते पाहायला मिळतात. जिंजीपासून ८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. येथील मुख्य आकर्षणांमध्ये भीमन् धबधबा, कोमुथेरी तलाव आणि अमिरथी प्राणीसंग्रहालय आहे.
नमक्कल जिल्ह्यात कोल्ली हिल्स आहे. कोल्ली हिल्स ही येथील 'हेअरपिन बेंड्स' आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. दाट जंगलातून जाणारा हा प्रवास अत्यंत रोमांचक आणि साहसी असतो. जिंजीपासूनचे सुमारे १७५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.येथील अगया गंगई धबधबा, अरपालेश्वर मंदिर आणि वनस्पति उद्यान पाहायला नक्की जा.
शेवरॉय हिल्समध्ये वसलेल्या येरकाडला अनेकदा ‘दक्षिणेचे रत्न’ म्हणून संबोधले जाते. येथे दाट जंगले, कॉफीच्या बागा आणि आल्हाददायक वातावरण अनुभवता येते. जिंजीपासून सुमारे २०५ किमी अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे. येरकाड लेक , पॅगोडा पॉइंट, किल्लियूर धबधबा आणि बेअर्स केव्ह ही प्रमुख ठिकाणे आहेत.
वाल्पराई अनामलाई टेकड्यांमध्ये वसलेले एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. चहाच्या विस्तीर्ण मळ्यांनी, दाट जंगलांनी आणि भव्य धबधब्यांनी हे ठिकाण वेढलेले आहे. जिंजीपासून सुमारे ३३० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. येथे गेल्यावर शोलायार धरण, अलियार धरणाला भेट द्या.
कालवरायण हिल्स ऐतिहासिक जिंजी किल्ल्याच्या नैऋत्येस सुमारे 130 किमी अंतरावर आहेत. कालवरायण हे सुमारे 1,095 चौरस किमी पसरलेले सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.