Crime: दुचाकीला कट मारल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाला दगड अन् लोखंडी रॉडने हात-पाय तुटेपर्यंत मारहाण

Ambarnath Crime: अंबरनाथमध्ये एका तरुणाला हात-पाय तुटेपर्यंत मारहाण करण्यात आली. दुचाकीला कट लागल्याच्या रागातून ही घटना घडली. वाद मिटवण्यासाठी बोलावून त्याला मारहाण करण्यात आली.
Crime: दुचाकीला कट मारल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाला दगड अन् लोखंडी रॉडने हात-पाय तुटेपर्यंत मारहाण
Ambarnath CrimeSaam tv
Published On
  • अंबरनाथमध्ये दुचाकीला कट लागल्यावरून कडाक्याचे भांडण

  • तरुणाला हात-पाय तुटेपर्यंत बेदम मारहाण

  • दगड आणि लोखंडी रॉडने तरुणावर जीवघेणा हल्ला

  • पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत शोध सुरू केला

अजय दुधाने, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये दुचाकीला कट लागल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुणाचा हात आणि कंबर फ्रॅक्चर झाली आहे. जुन्या वादातून ही घटना घडली. भांडण मिटवण्यासाठी तरुणाला मैदानात बोलावण्यात आले. त्यानंतर दोघांनी हात-पाय तुटेपर्यंत त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या स्वामीनगरमध्ये राहणाऱ्या विश्वा शिवलिंगम आणि याच परिसरात राहणाऱ्या करण बाबर या दोघांचा रविवारी दुपारी बाईकला कट मारण्यावरून वाद झाला होता. रविवारी संध्याकाळी विश्वाला करण बाबर आणि त्याचा मित्र तुषार गिरी यांनी जुन्या भेंडीपाड्याच्या मैदानात वाद मिटवण्यासाठी बोलावलं.

मात्र तिथे गेल्यानंतर करण बाबरसह साहिल सय्यद, नुमान सय्यद आणि तुषार गिरी यांनी विश्वा शिवलिंगम याच्यासह त्याचे मित्र मंथन सिंग, रोहित स्वामी, साईनाथ, शक्ती, महेश्वर यांना दगडाने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली.

Crime: दुचाकीला कट मारल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाला दगड अन् लोखंडी रॉडने हात-पाय तुटेपर्यंत मारहाण
Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

यावेळी इतर जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. तर मंथन सिंग हा एकटाच मारहाण करणाऱ्यांच्या हाती सापडला. त्याला या सर्वांनी मिळून बेदम मारहाण केली आणि तो मेला असं समजून तिथेच टाकून देत सर्वांनी तिथून पळ काढला. या मारहाणीत मंथन सिंग याचा हात, कंबर फ्रॅक्चर झाली असून जबड्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.

त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असला तरी कलम वाढण्याचीही शक्यता आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली.

Crime: दुचाकीला कट मारल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाला दगड अन् लोखंडी रॉडने हात-पाय तुटेपर्यंत मारहाण
Crime News: बायकोचे अनैतिक संबंध, विम्याच्या पैशांसाठी घेतला नवऱ्याचा जीव... सिनेमालाही लाजवेल अशी क्रूरता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com