किरकोळ वाद टोकाला गेला, नवऱ्याची लाथाबुक्यांनी बेदम मारहाण; बायकोचा जागीच मृत्यू

Kalyan Domestic Violence Wife Death Husband Arrested: कल्याण पूर्वेत किरकोळ कौटुंबिक वादाचे रूपांतर दुर्दैवी घटनेत झाले. पतीच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
Police investigation underway after a woman dies following an alleged assault by her husband in Kalyan East.
Police investigation underway after a woman dies following an alleged assault by her husband in Kalyan East.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात किरकोळ कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पतीला अटक करून त्याच्याविरोधात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रोड परिसरातील चाळीत राहणारे मुबीन खान आणि त्यांची पत्नी आयशाबानो यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते. १० जून रोजी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात मुबीन खान याने पत्नी आयशाबानो हिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

Police investigation underway after a woman dies following an alleged assault by her husband in Kalyan East.
KDMC चा मोठा निर्णय! नोटरी घरांवरील कर नाव हस्तांतरणास हिरवा कंदील

या मारहाणीत आयशाबानो गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिची प्रकृती खालावली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर आयशाबानोच्या बहिणीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुबीन खान याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

Police investigation underway after a woman dies following an alleged assault by her husband in Kalyan East.
Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

पत्नीला मारहाण करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com