Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Thane Water Supply Shutdown: ठाण्यामध्ये ३ जून रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे, मुंब्रा आणि कळव्यामध्ये पाणी पुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार आहे. कोणकोणत्या भागात पाणी येणार नाही वाचा...
Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?
Thane Water Supplygoogle
Published On
  • ३ जून रोजी ठाण्यात पाणीपुरवठा बंद

  • ठाण्यात १२ तास पाणी कपात

  • मुंब्रा आणि कळवा पाणीपुरवठा अपडेट

  • ठाणे महानगरपालिकेची महत्वाची सूचना

विकास काटे, ठाणे

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. ठाण्यामध्ये ३ जून रोजी १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि पाण्याची बचत करावी असे आवाहन ठाणे महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे. ठाणे महानगर पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशनमध्ये पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आणि अन्य तांत्रिक कामांचा समावेश असून ही कामे बुधवार ३ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत.

या कामांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. स्टेम) प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचा १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी जंक्शन, मुंब्रा आणि कळव्याच्या काही भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?
Thane Market Fire: भल्या पहाटे ठाण्यात अग्नितांडव! ठाणे रेल्वे स्टेशनजवळ भीषण आग, गावदेवी भाजी मार्केट खाक

या शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या काळात ठाणे, मुंब्रा आणि कळव्यातील नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?
Thane fire : ठाणे रेल्वे स्टेशनजवळ अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यू; २ गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com