Thane fire : ठाणे रेल्वे स्टेशनजवळ अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यू; २ गंभीर जखमी

Thane Gaodevi vegetable market fire : ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Thane market fire
Firefighters battle a massive blaze at Gaodevi Vegetable Market near Thane Railway Station.Saam TV Marathi
Published On

Thane Gaodevi vegetable market fire death Toll : ठाण्यातील प्रसिद्ध गावदेवी भाजी मार्केटमध्ये आज (२१ मे) पहाटे अत्यंत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेत आग विझवताना अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन अग्निशमन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची ५ मुख्य फायर वाहने, ३ जम्बो वॉटर टँकर, २ इतर वॉटर टँकर, ४ रेस्क्यू वाहने, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. तसेच घटनास्थळी ३ टीएमसी रुग्णवाहिका आणि १०८ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नौपाडा पोलीस आणि महावितरणचे कर्मचारीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पहाटे लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, नौपाडा येथील गोखले रोडवर असलेल्या गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला पहाटे ३:४३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. स्थानिक माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी तात्काळ या घटनेची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेतली. ७ ते ८ गाड्या आग विझवण्यासाठी पोहचल्या होत्या. पण कर्तव्यावर असतानाच अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

Thane market fire
Thane Market Fire: भल्या पहाटे ठाण्यात अग्नितांडव! ठाणे रेल्वे स्टेशनजवळ भीषण आग, गावदेवी भाजी मार्केट खाक

मृतांमध्ये अग्निशमन अधिकाऱ्याचा समावेश

आग एवढी भीषण होती की, ती विझवताना मोठा अनर्थ घडला. या घटनेत ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे (वय ४३ वर्षे) आणि महापालिका आरक्षक काळू शंकर गाडेकर (वय ५३ वर्षे) या दोघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. कर्तव्य बजावताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने ठाण्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Thane market fire
डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा! म्हणाले, "नेतान्याहू माझ्या इशाऱ्यावर चालणार, इस्रायलमध्ये माझी ९९% लोकप्रियता"

दोन जवान जखमी, कळवा रुग्णालयात उपचार सुरू

आग विझवताना अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी सुजित पष्टे (वय ४५ वर्षे) आणि तांडेल समीर जाधव (वय ४० वर्षे) हे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत.

प्रशासनाची मोठी फौज घटनास्थळी दाखल

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, श्रीमती मिताली मॅडम, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एस. वाय. तडवी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Thane market fire
Weather Alert: ५ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे! पुणे-कोकणात वादळी पाऊस तर विदर्भात तीव्र उष्णतेची लाट; तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com