Dombivli : डोंबिवलीत पाणी संकट! 'या' भागात २ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा सविस्तर

Dombivli Water Supply Cut News : एमआयडीसीकडून डोंबिवली, तळोजा आणि आसपासच्या भागात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
MIDC WATER CUT IN DOMBIVLI AND TALOJA DUE TO DELAYED MONSOON FEARS
MIDC WATER CUT IN DOMBIVLI AND TALOJA DUE TO DELAYED MONSOON FEARSSaam Tv
Published On
Summary
  • एमआयडीसीकडून मे महिन्यात दोन वेळा २४ तास पाणीकपात जाहीर

  • अल निनोमुळे पावसाळा उशिरा येण्याची शक्यता

  • डोंबिवली, तळोजा, उल्हासनगर भागांना मोठा फटका

  • नागरिकांना पाणी साठवण्याचे आणि काटकसर करण्याचे आवाहन

उन्हाळ्याच्या तीव्रतेसोबतच यंदाच्या पावसाळ्याबाबतही चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अल निनो आणि हिंदी महासागरातील द्विध्रुव (आयओडी) यांच्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एमआयडीसीकडून बारवी (जांभूळ) जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा काही कालावधीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे दुपारी १२ ते ८ मे दुपारी १२ आणि २१ मे दुपारी १२ ते २२ मे दुपारी १२ या कालावधीत प्रत्येकी २४ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. याशिवाय ९ मे आणि २३ मे रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

MIDC WATER CUT IN DOMBIVLI AND TALOJA DUE TO DELAYED MONSOON FEARS
Shocking : भरमंडपात रक्ताचा सडा, मेहुणीच्या लग्नात भाऊजीची हत्या, साडूनेच केला घात

या नियोजित पाणीकपातीचा परिणाम डोंबिवली आणि तळोजा औद्योगिक क्षेत्रांवर होणार असून, कल्याण-डोंबिवली महापालिका तसेच उल्हासनगर महापालिका हद्दीतील नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे. परिसरातील काही ग्रामपंचायतींमध्येही पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांसोबतच उद्योग क्षेत्रालाही काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ही पाणीकपात करण्याचा निर्णय २३ एप्रिल रोजी जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

MIDC WATER CUT IN DOMBIVLI AND TALOJA DUE TO DELAYED MONSOON FEARS
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

सध्या वाढत्या उष्णतेमुळे जलसाठ्यांवर ताण येत असून, भविष्यातील गरज लक्षात घेता नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. एमआयडीसी प्रशासनाने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि वापरात काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनावश्यक पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही सांगण्यात आले आहे. पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

MIDC WATER CUT IN DOMBIVLI AND TALOJA DUE TO DELAYED MONSOON FEARS
Nashik : नाशिक पुन्हा हादरलं! खासगी कोचिंग क्लासमध्ये १०वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, शिक्षिकेच्या भाच्याने रूममध्ये नेलं अन्...

दरम्यान, या निर्णयामुळे काही भागात नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणीही होत आहे. आगामी काळात पावसाळा लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com