Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Ketan Agarwal Case: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्येप्रकरणी अभिनेत्री हिना खान आणि आंचल खुराणा यांनी संताप व्यक्त केला. सत्य लपवण्यासाठी हत्या केल्याचा आरोप करत न्यायाची मागणी केली आहे.
Ketan Agarwal Case
Ketan Agarwal CaseSaam Tv
Published On

Ketan Agarwal Case: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवालच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांनीही या हत्याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अभिनेत्री हिना खानने या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करत समाजासमोर गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या प्रकरणाबद्दल आपले मत मांडले. तिने लिहिले की, आजच्या काळात खर बोलणे आणि ते स्वीकारणे इतके कठीण झाले आहे की लोक त्यासाठी एखाद्याचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. जर खर आधीच सांगितलं गेलं असतं तर एका तरुणाचा जीव वाचू शकला असता आणि सर्वांच्या आयुष्याचा मार्ग वेगळा आणि सुखी झाला असता. फक्त खरं बोलला असता तर ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला खरोखर राहायचे होते, त्याच्यासोबत तुमचे आयुष्य जगू शकला असता. तुम्ही असे का केले? केतन हत्या प्रकरण"

Ketan Agarwal Case
Anil Kapoor Daughter: अनिल कपूरच्या लेकीला मोठा धक्का; कोट्यवधींचे हिऱ्यांचे कानातले चोरीला, सिनेसृष्टीत खळबळ!

हिना खानपूर्वी अभिनेत्री आंचल खुराणानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. तिने केतन अग्रवालसाठी न्यायाची मागणी करत संपूर्ण घटनेवर संताप व्यक्त केला. आंचलच्या म्हणण्यानुसार, "केतन अग्रवाल अवघ्या २६ वर्षांचा होता. एका करोडपतीचा मुलगा आणि दुसऱ्या श्रीमंत बापाची मुलगी यांचे लग्न ठरले होते कारण दोन्ही कुटुंबे जवळचे होते. मात्र, त्या मुलीचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर सुरू होते. तू हे तुमच्या पालकांना आणि होणाऱ्या पतीला सहज सांगू शकला असता. तू त्याला (केतनला) कड्यावरून खाली ढकलून परिस्थिती सोडवण्याचा मार्ग निवडलास पण, आपल्या पालकांना खर सांगण्याचं धाडस नाही करु शकलीस? हा पुरुष विरुद्ध महिला असा विषय नाही. पण, मला फक्त हे विचारायचे आहे की या पिढीचे काय होत चालले आहे. सियाला त्याची हत्या करणे आवश्यक वाटले, पण पालकांना सत्य सांगण्याचे धाडस तिच्यात नव्हते. हा खरा चिंतेचा विषय आहे.

Ketan Agarwal Case
Savitribai Jyotirao Phule Serial: टीव्हीनंतर आता यूट्यूबवर; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेच्या डिजिटल प्रवासाला सुरुवात

दरम्यान, पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र तपासात पुढे ही घटना पूर्वनियोजित हत्या असल्याचा संशय बळावला. पोलिसांच्या माहितीनुसार, केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून हा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com