Anil Kapoor Daughter: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरच्या धाकटी मुलगी आणि प्रसिद्ध निर्माती रिया कपूर हिच्याशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रिया कपूरचे तब्बल 1.35 कोटी रुपये किमतीचे हिऱ्यांचे कानातले चोरीला गेले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिया कपूरची टीम एका मोठ्या फॅशन इव्हेंटसाठी न्यूयॉर्कला रवाना झाली होती. या कार्यक्रमासाठी सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सवलीन सिंग यांनी मुंबईतील दोन नामांकित ज्वेलर्सकडून हिऱ्यांच्या कानातल्यांच्या दोन जोड्या भाड्याने घेतल्या होत्या. हे दागिने विशेष कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार होते.
सवलीन सिंग गेल्या सात वर्षांपासून रिया कपूरसोबत काम करत आहेत. त्यांनी हे मौल्यवान दागिने काळजीपूर्वक दोन स्वतंत्र बॉक्समध्ये पॅक करून आपल्या हँडबॅगमध्ये ठेवले होते. रिया कपूर आणि तिची टीम 27 एप्रिल रोजी रात्री एमिरेट्सच्या विमानाने मुंबईहून दुबईमार्गे न्यूयॉर्ककडे रवाना झाली होती. ही टीम 28 एप्रिल रोजी न्यूयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. त्यानंतर हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर सवलीन सिंग यांनी दागिन्यांची तपासणी केली असता दोन्ही बॉक्स रिकामे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत माहिती दिली.
वृत्तानुसार, हे दागिने मुंबईतील 'मेहता ज्वेलर्स' आणि 'गोएंका ज्वेलर्स' यांच्याकडून भाड्याने घेण्यात आले होते. चोरी नेमकी कुठे झाली याबाबत त्यांनाच अजून माहिती नाही. मुंबई विमानतळावर, विमान प्रवासादरम्यान, दुबईतील ट्रान्झिटमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यानंतर ही घटना घडली असण्याची शक्यता तपासली जात आहे.
मुंबईला परतल्यानंतर सवलीन सिंग यांनी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रवासातील हालचाली आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असून या कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीचा तपास सुरू आहे. सध्या पोलिसांकडून विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रवासातील हालचाली आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करत असून या कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीचा तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.