स्वामी समर्थांच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला! शिर्डीहून अक्कलकोटला जात असताना भीषण अपघातात 5 महिन्यांच्या चिमूरडीचा मृत्यू

Shirdi To Akkalkot Accident News Today: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात भीषण अपघात झाला असून शिर्डीहून अक्कलकोटला जात असताना 5 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.
Mangaled car after a fatal collision with a truck near Karmala in Solapur district, leaving an infant dead and five family members critically injured.
Mangaled car after a fatal collision with a truck near Karmala in Solapur district, leaving an infant dead and five family members critically injured.saam tv
Published On

भरत नागणे, साम टीव्ही

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जातेगावजवळ रविवारी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. कार आणि हायवा ट्रक यांच्यात झालेल्या या धडकेत अवघ्या 5 महिन्यांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तर एकाच कुटुंबातील 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते, मात्र दर्शनापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Mangaled car after a fatal collision with a truck near Karmala in Solapur district, leaving an infant dead and five family members critically injured.
Mumbai Coastal Road: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडचे काम वेगात; १० ठिकाणी इंटरचेंज; वाचा कुठून कसा असणार?

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील शिर्डी येथील रहिवासी असलेले गमाजी नामदेव दुमसे हे आपल्या कुटुंबासह कारने सोलापूरच्या अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांची कार करमाळा तालुक्यातील जातेगाव परिसरात आली असता, समोरून येणाऱ्या एका वेगवान हायवा ट्रकने कारला जोरदार धडक दिली.

Mangaled car after a fatal collision with a truck near Karmala in Solapur district, leaving an infant dead and five family members critically injured.
Maharashtra Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचा धडाका, आयपीएस अधिकाऱ्यांसह ४४ पोलिसांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर कारचा पार चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. या अपघातात ५ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाला असून, दुमसे कुटुंबातील ५ सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Mangaled car after a fatal collision with a truck near Karmala in Solapur district, leaving an infant dead and five family members critically injured.
Dhule Crime : दुहेरी हत्याकांडानं धुळे हादरलं! बायकोसमोर अपमान केला म्हणून मुलानं आई-वडिलांची केली हत्या

या घटनेमुळे परिसरात आणि शिर्डी भागात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com