

महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल
४४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी आली समोर
मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, संभाजीनगरमध्ये बदल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनाप्रमाणे पोलिस दलात देखील मोठे फेरबदल केलेत. मुख्यमंत्र्यांनी अप्पर पोलीस महासंचालक श्रेणीतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शुक्रवारी गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांसह ४४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. मुंबईतील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, जळगाव, सोलापूर, जालना, नवी मुंबई, रायगड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या ४४ पोलिस अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये कुणाच्या नावाचा समावेश आहे? आणि त्यांची बदली कुठे करण्यात आली हे आपण जाणून घेणार आहोत...
१. विजय खरात - पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई.
२. विशाल गायकवाड - अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे शहर.
३. गणेश शिंदे, पोलीस उप आयुक्त, मुंबई
४. दिनेश बारी, पोलीस अधीक्षक, दहशतवादी विरोधी पथक, मुंबई
५. उज्ज्वला वानकर, राज्य गुप्तवार्ता, मुंबई.
६. संदीप जाधव, पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक शहर
७. यशवंत सोळंखे, अपर पोलीस अधीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी पथक, नागपूर.
८. अनिता पाटील, पोलीस अिीक्षक, नागरी हक्क संरक्षण, अमरावती
९. पंकज डहाणे, पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई.
१०. पल्लवी बर्गे, पोलीस अधीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे.
११. स्वाती रामराव भोर, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 12,हिंगोली
१२. सांभाजी कदम, पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
१३. अकबर पठाण,महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक.
१४. महेश चिमटे, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक.
१५. कविता नेरकर, पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
१६. संजय गौंडा पाटील, पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड
१७. मितेश घट्टे, पोलीस अधीक्षक, फोर्स वन.
१८. सुहास बावचे, सहायक पोलीस महानिरीक्षक, दक्षता.
१९. पूर्णिमा चौगुले, पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई.
२०. तानाजी संभाजी चिखले, डायल 112, नवी मुंबई
२१. धीरज पाटील, पोलिस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड.
२२. विशाल ठाकुर, पोलिस उप आयुक्त, नवी मुंबई.
२३. सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधीक्षक, धाराशिव.
२४. हिम्मत जाधव, पोलीस उप आयुक्त, बृहम्मुंबई.
२५. दिपक गिऱ्हे, पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर.
२६. रमेश नागनाथ चोपडे, उप आयुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तावार्ता विभाग.
२७. विजय व्यंकटराव कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.
२८. चंद्रकांत वामनराव गवळी, पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर.
२९. विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक, जालना
३०. रोहिदास पवार, पोलीस उप आयुक्त, पिंपरी-चिंचवड
३१. योगेश चव्हाण, पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई.
३२. राहुल खाडे, पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई.
३३. सचिन गोरो, एक वर्ष मुदतवाढ.
३४. शिवाजी पवार, पोलिस उप आयुक्त, बृहन्मुंबई.
३५. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, जळगाव.
३६. वैशाली शिंदे, उप आयुक्त, विशेष सुरक्षा पथक, राज्य गुप्तावार्ता विभाग.
३७. प्रितम यावलकर, पोलीस उप आयुक्त, सोलापूर
३८. तिरुपती काकडे, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, रायगड.
३९. राहुल मदने, पोलीस उप आयुक्त, एक वर्ष मुदतवाढ
४०. प्रिती टिपरे, पोलीस उप आयुक्त, मिरा भाईंदर-वसई-विरार.
४१. प्रशांत अमृतकर, पोलीस उप आयुक्त, पुणे शहर.
४२. प्रशांत रामेश्वर स्वामी, अपर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण.
४३. आरती बनसोडे, समादेशक, राज्य राखीव, पोलिस बल, गट क्र.७
४४. विक्रम देशमुख, पोलीस उप आयुक्त, मिरा-भाईंदर-वसई-विरार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.