IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

IPS Officer Transfer List 2026: महाराष्ट्रातील राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. जवळपास २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे राज्याच्या प्रशासनात खळबळ उडाली.
IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ
IPS Officer Transfer Listsaam Tv
Published On
  • महाराष्ट्र आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल

  • तेजस्वी सातपुते बदली बातमी

  • पुणे मुंबई नाशिक पोलीस बदल्या

  • राज्य सरकारचा आयपीएस बदली आदेश

महाराष्ट्र सरकारने राज्य पोलिस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शुक्रवारी सरकारकडून बदल्यांबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले. राज्यभरातील अनेक बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईसह पुणे, नाशिक तसेच इतर जिल्ह्यातील अधीक्षकांच्या सुद्धा बदल्या करण्यातआल्या आहेत. राज्यातील एकूण २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे राज्याच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.

तेजस्वी सातपुते, प्रवीण मुंडे, राकेश ओला, लखमी गौतम, रंजन शर्मा यासारख्या बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संजय दराडे पुणे शहराचे नवीन पोलिस सह आयुक्त तर प्रवीण पडवळ नाशिक परिक्षेत्राचे नवीन विशेष पोलिस महानिरीक्षक असणार आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चौकशी करणाऱ्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची बदली पुण्यात करण्यात आली आहे.

राज्यातील कुठल्या बडा अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या?

कृष्ण प्रकाश: अपर पोलीस महासंचालक (प्रशासन)

दत्ता कराळे: विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग

प्रवीण पडवळ: विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

लखमी गौतम: विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था

मनोज शर्मा: सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, मुंबई

सुवेज हक: सह आयुक्त (प्रशासन), मुंबई

महेश पाटील: विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय)

परमजित दहिया: विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक

सी के मीना: विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण विभाग

संजय दराडे: पोलीस सह आयुक्त, पुणे

रंजन शर्मा: विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

सुनिल फुलारी: विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व)

राजेश प्रधान: पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई

निशिथ मिश्रा: विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण

जय कुमार: विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन (पद अवनत करुन)

संजय येनपुरे: विशेष पोलीस महानिरीक्षक, व्ही.आय.पी. सुरक्षा

संजय जाधव: अपर पोलीस आयुक्त, ठाणे

दिपक साकोरे: अपर पोलीस आयुक्त, नवी मुंबई

पंजाबराव उगले: विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृह निर्माण महामंडळ (पद अवनत करुन)

एस. व्ही. पाठक: विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

विनायक देशमुख: नियंत्रक, वैधमापन

ज्योती प्रिया सिंग: विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक (पदोन्नतीने)

अनिल कुंभारे: पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई

सत्य नारायण: पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com