अक्षय बडवे, साम टीव्ही
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून आज अंदमानमध्ये मान्सून दाखल असून मागच्या वर्षी पेक्षा ६ दिवस अगोदरच अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ.एस.डी.सानप यांनी दिली. याबाबत हवामान विभागाचे प्रमुख डॉ सानप म्हणाले की, आज मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे.
गेल्या २४ ते ४८ तासांपासून अंदमानमध्ये पाऊस पडताना पहायला मिळत आहे. मान्सूनचे वारे सक्रिय झाल्यामुळे मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून केरळमध्ये येत्या २६ मे पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील अंदाजानुसार सरासरीच्या ९२ टक्के इतका यंदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी एल निनो' सक्रिय होत असल्यामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी कमी राहू शकते असे यावेळी ते म्हणाले.
सध्या उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. अकोला, जळगाव आणि नंदुरबार यांसारख्या शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मात्र येत्या दोन दिवसांत तापमानात घट होणार.
मान्सून याच गतीने सुरू राहिल्यास तो 5 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने असेही सांगितले आहे की, एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी देशात सामान्यपेक्षा किंचित कमी पाऊस एलपीएच्या सुमारे 92 टक्के पडण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.