

जळगावमध्ये २८ महिन्यांत ५० अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार
बहुतांश आरोपी पीडितांचे परिचित, नातेवाईक किंवा शेजारी असल्याचे उघड
अनेक आरोपी सध्या जामिनावर बाहेर
जळगावमधील मुलांवरील अत्याचाराच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यामध्ये लहान मुलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आरोपी अल्पवयीन मुलांना टार्गेट करून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. काही घटनांनामध्ये लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या देखील केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या २८ महिन्यांत ४६ मुली आणि ४ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये गंभीर बाब म्हणजे या पीडित बालकांचे लचके तोडणारे दूरचे कुणी नाही तर बहुतांश परिचित असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.
अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण अशाच घटना आपल्या आजूबाजूला घडतात. या पार्श्वभूमीवर आता पालकांनीच सजग राहणे खूप गरजेचे आहे. कुणीही काका-मामा किंवा गल्लीतील नातेवाईक आपल्या मुलांना प्रलोभन देत असेल तर आपण काळजी घेणे अपेक्षित आहे. इतर वेळी घडणारी लैंगिक अत्याचारांची प्रकरणे प्रेमप्रकरण, लग्नाचे आमिष किंवा प्रलोभन देऊन करण्यात येणारे शोषण या गटात मोडतात. मात्र, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, गेल्या २८ महिन्यांत दाखल असलेल्या बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांत परिचितांकडूनच हे गुन्हे घडल्याचे निष्पन्न झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
७ वर्षांपेक्षा कमी वय : ११
१४ वर्षांपेक्षा कमी वय : १६
१७ वर्षांपेक्षा कमी वय : २३
सगळ्यात कमी वयाची पीडित : वय ३
१४ वर्षे वय : २ संशयित
१७-१९ वय : १२ संशयित
२१-३० वय : २२ संशयित
३०-५० वय : ८ संशयित
६० व अधिक वय : ६ संशयित
सगळ्यात वयस्कर आरोपी वय : ७८
ओळखीचा : २५
नातेवाईक : १०
शेजारी : १२
मित्र : १
स्कूल संबंधित : २
अज्ञात : ० (महत्त्वाचे)
शेजारच्या घरात: २८
शेतात: ११
कारमध्ये: १
व्हॅनमध्ये: १
खुल्या जागेत: ९
जेलमध्ये : २२
शिक्षा झालेला: १ (५ वर्ष शिक्षा)
उरलेले जामिनावर बाहेर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.