Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. गॅस सिलिंडर देण्याच्या बहाण्याने तिला आरोपी सोबत घेऊन गेले. शेतावर नेऊन या महिलेसोबत भयंकर कृत्य केले.
Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...
Uttar PradeshSaam Tv
Published On

Summary:

  • उत्तर प्रदेशमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

  • गॅस सिलिंडर देण्याच्या बहाण्याने केलं भयंकर कृत्य

  • अश्लिल व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप

  • भोजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मोदीनगरमधील भोजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. आरोपींनी या महिलेला सिलिंडर देतो असे सांगून सोबत घेऊन गेले. या महिलेवर शेतात नेऊन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी यावेळी मोबाइलवर अश्लिल व्हिडीओ तयार केला आणि याद्वारे महिलेला ब्लॅकमेल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय महिलेवर सिलिंडर देण्याचे आमिष दाखवून तिला सोबत नेऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत या महिलेवर वारंवार बलात्कार केले. तिने विरोध केल्यावर आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. आरोपींनी अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...
Crime: गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला रॉकेल ओतून जिवंत जाळलं; प्रपोज करते म्हणत खुर्चीवर बसवलं, डोळ्यांवर पट्टी अन् हात-पाय बांधले नंतर...

भोजपूरमधील एका गावातील २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. काही काळापूर्वी तिच्याच गावातील एका तरुणासोबत तिची मैत्री झाली होती. शुक्रवारी त्या महिलेला सिलिंडरची गरज होती. जेव्हा तिने त्या तरुणाकडे सिलिंडर मागितला तेव्हा तो तिला एका शेतावर घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने एका बोअरवेलजवळ तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीचा साथीदार तिथे आला आणि त्याने गुपचूप आपल्या मोबाईल फोनवरमध्ये त्यांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले.

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...
Crime: दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले, घरात घुसून मायलेकीची हत्या; नंतर आरोपीने उचललं टोकाचं पाऊल

त्यानंतर त्याने त्या व्हिडिओचा वापर करून त्या महिलेला ब्लॅकमेल केले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने देखील महिलेवर बलात्कार केला. महिलेने आरोपीकडे मला सोडून द्या अशी विनवणी केली पण आरोपीला दया आली नाही. आरोपींनी या महिलेला यावेळी मारहाण देखील केली. तसंच, जर कुणाला काही सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

शेवटी घाबरलेल्या महिलेने घरी येऊन कुटुंबीयांना घटनेविषयी सांगितले. त्यानंतर तिने कुटुंबीयांसोबत भोजपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. अरविंद आणि पंकज अशी आरोपींची नावं असून पोलिस सध्या त्यांची चौकशी करत आहेत.

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...
Crime News: बायकोचे दिव्यांग व्यक्तीसोबत संबंध, नवऱ्याने त्याला शेतात नेऊन दारू पाजली आणि...! 37 दिवसांनी उघड झालं चक्रावणारं सत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com