LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

LPG Gas Cylinder: एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे. गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेले मोबाईल नंबर आता तात्काळ बदलता येणार नाहीत.
LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल
LPG Gas Cylindersaam tv
Published On

Summary:

  • एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठा बदल झाला

  • गॅस कनेक्शनवरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी नवा नियम

  • गॅस सिलिंडर फसवणूक रोखण्यासाठी नवा नियम जारी

  • ग्राहकांना मोठा झटका बसला

एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे. गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेले मोबाईल नंबर आता तात्काळ बदलता येणार नाहीत. पेट्रोलियम कंपन्यांनी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी एक नवीन प्रणाली लागू केली आहे.

एलपीजी सिलिंडरच्या नव्या नियमानुसार, गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेले मोबाईल नंबर लगेच बदलता येणार आहे. मोबाईल नंबर बदलण्यासाठी ९० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासाठी आता बायोमेट्रिक पडताळणी आणि केवायसी प्रक्रिया देखील अनिवार्य करण्यात आल्या आहेत.

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल
LPG Gas: LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

गॅस कनेक्शनवरील मोबाईल नंबर बदलून होणाऱ्या फसव्या डिलिव्हरी आणि काळाबाजाराच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या नकळत मोबाईल नंबर बदलले जात होते. या सर्व गोष्टी रोखण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी नियम अधिक कडक केले आहेत. गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेला मोबाईल नंबर बदलण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागणार असल्यामुळे सर्वसामान्यांना झटका बसला आहे.

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल
LPG Rule: मोठी बातमी! १ मेपासून एलपीजी सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

पूर्वी ग्राहक गॅस एजन्सी किंवा पोर्टलद्वारे आपला मोबाईल नंबर तात्काळ अद्ययावत करू शकत होते. पण आता ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. नवीन नंबर पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागणार आहे. मोबाईल नंबर बदलण्यासाठी आता बायोमेट्रिक पडताळणी आणि केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे बदल करणारी व्यक्ती खरीच आहे याची खात्री केली जाणार आहे.

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल
LPG New Rule: मोठी बातमी! LPG सिलिंडरच्या नियमात मोठा बदल, 'ही' एक चूक केल्यास गॅस कनेक्शन होईल कट

नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर अनेक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः ज्यांना आपला नंबर त्वरित बदलायचा आहे त्यांना आता जास्त वेळ थांबावे लागणार आहे. मोबाईल नंबर अद्ययावत करण्यास होणाऱ्या विलंबामुळे गॅस बुकिंग आणि डिलिव्हरी मेसेज मिळण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. परिणामी हे काम करण्यास वेळ लागत असल्यामुळे ग्राहकांनी गॅस सिलिंडर मिळण्यास देखील विलंब लागू शकतो.

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल
LPG Rule Change: सर्वसामान्यांना दिलासा! गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात बदल होणार, कोर्टाच्या आदेशानंतर सरकार मोठा निर्णय घेणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com